मनोगत :
हाय फ्रेंड्स, मी सविता कानडे. मी २०१५ साला पासून सातत्याने ट्रेकिंगला सुरुवात केली. त्यावेळी माझे वय ४७ वर्ष होते. वयाचा उल्लेख अशासाठी की त्याआधी कोणताही व्यायाम मी सातत्याने कधी
केला नव्हता. शाळा, कॉलेज, नोकरी आणि मग काही कौटुंबिक कर्तव्य....आता पर्यतच आयुष्य
ह्यावरच केद्रित गेल.थोडं वजन वाढलंय असं वाटलं की काही काळ दोरीवरच्या उड्या मारा
किंवा बागेत सकाळी चालायला जा. बस्स इतकचं!. हा...चालायची सवय मात्र आहे.
२०१५ सालीच केलेल्या ट्रेक मधे समावेश आहे, कातळधर धबधबा, कलावंतीण
दुर्ग, माथेरान, केटूएस नाईट ट्रेक आणि मा. कळसुबाई. २०१६ मधील ट्रेक मधे समावेश
आहे, ढाक बहिरी, तोलारखिंड मार्गे हरिश्चंद्रगड, २ वेळा वासोटा, राजगड, विसापूर, तुंग-तिकोना,
अंधारबन जंगल ट्रेक, केटूएस डे ट्रेक इ.
ट्रेकचे अनुभव
लिहावेत असं जून २०१६ ला मनात आलं आणि लिहायला सुरुवात केली. अनुभव लिहिण्याचा
उद्देश हाच की सातत्याने व्यायाम नसणा-या या शरीराला या वयात ट्रेक करताना मी
कोणकोणत्या भाव-भावनांमधून गेले हे समोर यावे. ट्रेक दरम्यानच्या शारीरिक आणि
मानसिक स्थितीवर मात करून ट्रेक समीट करण्यामागे कोणत्या गोष्टींच योगदान होतं हे
समोर यावं. या अनुभवांमधे गडाचा/किल्ल्यांचा इतिहास, ट्रेकचा इंडयूरन्स/ग्रेड इ.
सारखी माहिती नाही. ह्याचे कारण की ही माहिती तुम्हाला गुगल,सोशल मिडिया, पुस्तके
इ. सारख्या माध्यमातून मिळेल. एवढच काय ट्रेकिंग ग्रुपचे मेंबर देखील ही माहिती
तुम्हाला देतील. म्हणूनच ह्या अनुभवांमधे भाव-भावनांवर जास्त भर दिलेला आहे. ह्या
भाव-भावना वाचताना तुम्ही आनंदी झालात तर ट्रेकचे अनुभव लिहिण्याचा उद्देश सफल
झाला असे मला वाटेल. त्यापलीकडे, अनुभव वाचताना ट्रेक करण्याची प्रेरणा तुम्हाला
मिळाली तर अनुभव लिहिण्याचे आत्मिक समाधान मला मिळेल.
अनुभव वाचल्यानंतरची
तुमची प्रतिक्रिया, मते आणि सूचनांचा आनंदाने स्वीकार आहे!
हॅॅपी ट्रेकिंग!
हॅॅपी ट्रेकिंग!
2 comments:
तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणा देत राहील. अशीच भटकंती करत रहा, लिहीत राहा. तुम्हाला खूप शुभेच्छा मॅडम 😊👍
Thank you Suprasad!
Post a Comment