दुर्गप्रेमी श्री. गो. नी. दांडेकर त्यांच्या 'एका
गडभटक्याची गोष्ट’ या पुस्तकात लिहितात, ‘ट्रेकिंग अथवा गडभटकंतीचे भूत वेताळा
पेक्षा भयंकर. एकदा मानेवर बसले की मग वय, ठिकाण, काळ याची परवा-तमा नाहीच. कसला
प्रश्न असतो त्या वेताळाला माहित नसतो आणि उत्तर कोठे शोधावे हे त्या विक्रमालाही
माहित नसते. भटकंतीचा हा विक्रम-वेताळाचा खेळ सुरु होता होत नाही. पण चुकून सुरु
झालाच तर मात्र थांबणे अशक्यच; अगदी शेवटच्या श्वासापर्यंत!’
प्रश्न-उत्तरांच्या वाटेवरील गडभटकंतीच्या साहसी खेळाने
तिच्या आयुष्यात देखील दस्तक दिली. ती २७ वर्षांची. मुंबईत राहणारी. वयाच्या २३
वर्षापर्यंत लोणावळया जवळील लोहगड किल्लादेखील तिच्या अज्ञातवासातला. बी.कॉम करता
करता चार्टर्ड अकौंटंन्सी (सीए) आणि मग कन्सलटिंग फर्म मधे नोकरी. हेच तिच जीवन. शिक्षण,
दीर्घकालीन तासांची नोकरी आणि घर या चक्राभोवती फिरणारी. नोकरीची पाच वर्ष अश्शी
गेली. वाढलेले वजन, संप्रेरकातील
असमतोलामुळे आलेल्या समस्यांनी त्रस्त. ‘कोणतातरी व्यायाम नियमित करायचाय’ ही धारणा. वयाच्या २४-२५ व्या वर्षी ट्रेकिंगच भूत मानगुटीवर बसलं आणि ती ‘पर्वतमय’
झाली!
तीन वर्षात सह्याद्रीतील साधारण १२५ ट्रेक्स आणि हिमालयातील ११ ट्रेक्स तिने पादाक्रांत केले. ट्रेकचे सुरेख अनुभव लिहून "ट्रेक ब्लॉगर" म्हणून फ्रेंड सर्कल मधे तिला ख्याती मिळाली. ‘Girl on the Mountains’ या अनोख्या नावाने ती सोशल मिडियावर सक्रीय राहिली. 'Why I trek and Why you should too' तसेच ‘Trekking during your periods: Yay or Nay?” सारखे प्रमोशनल ब्लॉग तिने लिहिले. श्री. हरीश कपाडिया, सुप्रसिद्ध हिमालयीन माउंटेनिअर, लेखक आणि "हिमालयीन" या भारतातून प्रकाशित होणाऱ्या जनरलचे संपादक हे तिचे रोल मॉडेल.
तीन वर्षात सह्याद्रीतील साधारण १२५ ट्रेक्स आणि हिमालयातील ११ ट्रेक्स तिने पादाक्रांत केले. ट्रेकचे सुरेख अनुभव लिहून "ट्रेक ब्लॉगर" म्हणून फ्रेंड सर्कल मधे तिला ख्याती मिळाली. ‘Girl on the Mountains’ या अनोख्या नावाने ती सोशल मिडियावर सक्रीय राहिली. 'Why I trek and Why you should too' तसेच ‘Trekking during your periods: Yay or Nay?” सारखे प्रमोशनल ब्लॉग तिने लिहिले. श्री. हरीश कपाडिया, सुप्रसिद्ध हिमालयीन माउंटेनिअर, लेखक आणि "हिमालयीन" या भारतातून प्रकाशित होणाऱ्या जनरलचे संपादक हे तिचे रोल मॉडेल.
ट्रेकिंगच्या भूताला मानगुटीवर घेऊन प्रश्न-उत्तरांच्या वाटेवर स्वत:चा शोध घेणारी ही मुलगी आहे, साईनी कृष्णमूर्ती!
साईनीचा जन्म, शिक्षण, नोकरी हे सर्वच मुंबईत. वडील महिंद्रा
अॅन्ड महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त, आई गृहिणी आणि मोठी बहीण लग्नानंतर अमेरिकेत
स्थायिक. वडील हॉकी खेळाडू आणि योग शिक्षक. एक पुढारलेल व्यक्तिमत्व. मुलींनी पुस्तकी
शिक्षणातचं न गुरफटता खेळावरही केंद्रित असावं ही त्यांची इच्छा. दोन्ही मुलींनी त्यांच्या
इच्छेला फाटा दिला. दोघी शिक्षणातचं रमल्या. साईनीला वाचनाची प्रचंड आवड. खासकरून
इंग्लिश भाषेतील साहित्य. मराठी भाषा ती छान बोलते. मराठी साहित्य वाचन आणि लिखाण अजून
अबोधचं.
साईनीने माटुंग्याच्या पोतदार कॉलेज मधून बी.कॉम केलं.
समांतरपणे चार्टर्ड अकौंटंन्सी (सीए) केलं. इंटर्नशिप करताना ‘कन्सल्टींग’
क्षेत्र तिला आवडू लागल. सीएचा रिझल्ट लागल्यावर २०१३ मधे एका
कन्सल्टींग फर्म मधे नोकरी लागली. अडीच वर्षाच्या नोकरी दरम्यान; शिक्षण किंवा आरोग्य
या क्षेत्रामधे काम करायला आवडेल हे साईनीला जाणवल. २०१६ मधे शिक्षण क्षेत्रात काम
करणाऱ्या कन्सल्टींग फर्ममधे नोकरी मिळाली. साईनीच मनोरथ पूर्ण झालं. साईनी सांगते, “शिक्षणाकडे एक सामाजिक क्षेत्र म्हणून पाहिलं जातं; परंतू आमच्यासाठी
शिक्षण हे एक ‘कन्झ्युमर प्रोडक्ट’ आहे. उदा. टूथपेस्ट बाजारात विकत घेताना आपण
जसे निकष लावतो; तद्वतच शिक्षणही आपण निकष लावून निवडतो”. साईनीला आवडलेल्या ह्या
क्षेत्रामुळे तिला सिंगापूर, केनिया, साउथ आफ्रिका, इंडोनेशिया, व्हियेतनाम सारख्या
देशात जाण्याची संधी मिळाली.
सतत अभ्यासात रममाण, सीए सारखे कठीण कार्यक्षेत्र, कामाचे प्रदीर्घ
तास, व्यायामाकडे दुर्लक्ष. काही वर्षांपूर्वीची साईनीची ही जीवनशैली! साईनी सांगते, “मागील ३-४ वर्षापासून व्यायाम आणि ट्रेकिंग मुळे मी तरुण दिसते. उंचीला
योग्य वजन आहे. व्यायामामुळे पिरियड्स निगडीत त्रास कमी झाला आहे".
‘फिटनेससाठी नियमित व्यायाम करायचा आहे’ या एका धारणेने साईनी ट्रेकिंगकडे वळाली. २०१५ मधे
दसऱ्याच्या दीर्घकालीन सुट्ट्यात, आउटडोअर मध्ये काय करता येईल ह्याचा ऑनलाईन शोध घेताना
‘ट्रेक मेट्स’ ग्रुप समोर आला. पहिल्या ट्रेकचा अनुभव ती सांगते,“ फिटनेससाठी
ट्रेक केला. क्षमतांचा कस लागला. परतताना एक अनुभव सोबत घेऊन आले. फिटनेस सोबत
आनंदही मिळाला, खूप शिकायला मिळाल”.एका अनुभवाने ट्रेकिंगच खुलं विश्व साईनीसाठी
उघडल. ट्रेकिंग हा छंद जोपासायचा आहे असा निश्चय पक्का झाला. साईनी म्हणते, “आपण
खूप नशीबवान आहोत की आपण महाराष्ट्रात राहतो. सह्याद्री आपल्या शेजारी आहे. हिमालय
अॅक्सिसीबल आहे. भारतातील माउंटन्स बघायला लांबचा प्रवास करून लोक येतात. मग आपण
का नाही?”.
सह्याद्रीच वर्णन करताना ती लिहिते, "सह्याद्री ही पर्वतरांग नसून एक भावना आहे"!
‘I am a sunburnt person, who likes
the mountains very much. I am the girl on the mountains’ तीन वर्षात निर्माण
झालेली तिची ही ओळख!
सह्याद्रीतील चंदेरी, पट्टा, रंजनगड, रामशेज, माहुली. धोडप,
माणिकगड, महाकाल, अशेरीगड सारखे ऑफ बीट ट्रेक्स, लिंगाणा, अलंग-मलंग-कुलंग, ढाक
बहिरी सारखे तांत्रिकदृष्ट्या कठीण ट्रेक्स असोत,,
किंवा हिमालयातील चंद्र्शीला पीक,
भ्रीगु लेक, पांगरचुला, केदारकांथा, रुपीन पास, दयारा भूग्याल, व्हॅली ऑफ फ्लावर्स
सारखे हाय अल्टीटयूड ट्रेक्स असोत. साईनी, दोन्ही भूप्रदेशातील ट्रेक्स तितक्याच
सहजतेने करते.
सह्याद्री आणि हिमालय ट्रेक्सच वर्णन करत ती सांगते,
“सह्याद्री मध्ये अल्टीटयूट तुमच्या बरोबर असतो, हवामान जास्त तीव्र असतं,
सह्याद्रीत एन्ड्युरन्स जास्त लागतो, टेंटची गरज जास्त लागत नाही, घर, शाळा, मंदिर
झोपायला मिळतात, भाषेचा प्रश्न येत नाही, इथली इकोसिस्टीम वेगळी आहे, सह्याद्रीला
इतिहास आहे. हिमालयात अल्टीटयूड आव्हानात्मक आहे, हाईट मर्यादा घालते, एका दिवसात
काही एक किलोमीटरच तुम्ही चालू शकता, पूर्व तयारी जास्त करावी लागते, बदलत्या
हवामानासाठी सुसज्ज रहावे लागते, उंचशिखर, बर्फ जवळून बघायला मिळते, हिमालयातील
इकोसिस्टीम वेगळी आहे. इथली फुले, प्राणी वेगळे आहेत”.
‘चंद्रशीला पीक’ हा तिने केलेला पहिला हिमालयीन सोलो ट्रेक!
डिसेंबर महिन्यात एका ग्रुपसोबत हा ट्रेक केला. शिखरावरचा सूर्योदय पाहण्याच्या
निश्चयाने एप्रिल मधे हा ट्रेक तिने एकटीने केला. ट्रेक प्लॅन करण्यापासून
सर्वकाही तिने स्वत: केलं. “सूर्योदय पाहण्यासाठी मी पहाटे ३.३० निघाले. जंगलातील
रस्ता. काळाकुट्ट अंधार. दर १० मिनिटाने मी मागे वळून पाहतेय. प्राणी तर पाठी नाही
ना? थोडी घाबरले पण चालत राहिले. तुंगनाथच शिव मंदिर आणि शिखरावरचा सूर्योदय
डोळ्यासमोर आणला. नवीन उर्जा मिळाली. भीती गायब झाली. शिखर आनंदाने चढू लागले”.
शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणं साईनीला आवडत.
पर्वतांमधे रमणारी साईनी लिहिते, ‘ I don’t know
why but everything is better on the mountains. The water tastes sweeter, simple
food tastes gourmet, a nice arm spot to sleep feels cozier than a lavish queen
sized bed, sitting on the ground is like sitting on the luxurious couch’.
साध्या चालण्याने निसर्गाचा आनंद ट्रेक देतो. पुढे जाऊन साईनी सांगते, “ट्रेकिंग मुळे वर्तनामधे बदल झाला. चंचलपणा कमी झाला. संयम वाढीस
लागला. बहुविध व्यक्तीमत्वाच्या लोकांसोबत जुळवून घेऊन एक टीम म्हणून काम करायला
शिकले. वेगळ नेटवर्क ओपन झालं. ट्रेकिंग सुरु करण्यामागचा ‘फिटनेस’ हा उद्देश सफल
झाला. व्यायाम आणि ट्रेकिंगमुळे अनियमित पिरियड्स नियमित झाले. ट्रेकिंग
करण्यासाठी फिट राहणे आणि ट्रेकिंग मुळे फिट असणे हे दोन्ही साध्य झालं”.
आठवड्यातून तीन दिवस रनिंग, आठवड्यातून १-२ वेळा घरच्याघरी
स्ट्रेन्थ आणि बॉडी वेट ट्रेनिंग, क्रन्चेस, जम्पिंग जॅक, अप्पर आर्म, हिप कोअर इ.
व्यायाम फिटनेसच्या दृष्टीने सुरु असतात. पहिले काही महिने ट्रेकिंग ग्रुप सोबत
ट्रेक केल्यानंतर ट्रेकची आवड असणारे काहीजण एकत्र आले आणि साईनी त्याचा एक भाग
झाली. ८-१० जणांच्या या ग्रुपमधे ट्रेक प्लॅन करण्यापासून सर्व कामांची विभागणी
होते. त्यामधे ट्रेक ठरवणे, ट्रेक पायथ्याच्या गावाचा शोध, प्रवास वाहनाची माहिती
काढणे, वाटाड्या ठरवणे, फूड, पाणी, राहण्याची व्यवस्था इ. चा समावेश आहे. ‘ऑफ बीट (अन-एक्सप्लोअर्ड)
ट्रेक्स करणे आणि अधिक वेगाने ट्रेक करणे’ हा या ग्रुपचा प्रयत्न असतो. ह्या ग्रुप ने हिमालयीन
ट्रेक सायनीच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर केले.
ट्रेक मधील तांत्रिकबाजू बळकट व्हावी, रॅप्लिंग, क्लायंबिंग
शिकून समृद्ध होण्यासाठी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स (बीएमसी) करण्याची साईनीची इच्छा.
पूर्ण झाली ती २०१८ मधे!
हिमालयीन माउंटनिअरिंग इंन्स्टीटयूट (एचएमआय) मधून "ए" ग्रेड मिळवून जिद्दीच्या जोरावर तिने बीएमसी साध्य केल. एचएमआय ने मुलींसाठी अरेंज केलेली ७३ मुलींची ही बॅच. पुढे गेलेल्या ५० मुलींपैकी ३० मुलींना "ए" ग्रेड मिळाली. बीएमसी मुळे "हार्डशिप सहन करण्याची समज वाढली, टेक्निकल नॉलेज मुळे कॉन्फिडन्स वाढला" असे साईनी सांगते. अॅडव्हान्स कोर्स हे तिचे पुढील ध्येय!
हिमालयीन माउंटनिअरिंग इंन्स्टीटयूट (एचएमआय) मधून "ए" ग्रेड मिळवून जिद्दीच्या जोरावर तिने बीएमसी साध्य केल. एचएमआय ने मुलींसाठी अरेंज केलेली ७३ मुलींची ही बॅच. पुढे गेलेल्या ५० मुलींपैकी ३० मुलींना "ए" ग्रेड मिळाली. बीएमसी मुळे "हार्डशिप सहन करण्याची समज वाढली, टेक्निकल नॉलेज मुळे कॉन्फिडन्स वाढला" असे साईनी सांगते. अॅडव्हान्स कोर्स हे तिचे पुढील ध्येय!
बीएमसी कोर्स पूर्ण करून आल्यानंतर तीच अंतरंग ओढ घेत होत अजून एका ध्यासाकडे. १९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात साईनी ने स्वत:च अजून एक स्वप्न, अजून एक ध्येय पूर्ण केला. हो, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक! हा ट्रेक तीन सोलो, गाईड आणि पोर्टर न घेता केला.
तिच्या ह्या ट्रेकचे संपूर्ण वर्णन तिने इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहे.
शुक्रवारी घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना साईनीच्या पाठीवर ट्रेकची बॅकपॅक असते. शनिवार-रविवार सायनी घरी नसण्याची तिच्या आई-वडिलांना सवय झालीय. ट्रेकिंग मधील धोक्याची आई-वडिलांना जाणीव आहे. ट्रेकला गेली नाही तर साईनी अस्वस्थ असते ही गोष्ट ते बखुबी जाणून आहेत. ‘ट्रेक हा इतर छंदासारखा एक छंद आहे. तो जोपासला पाहिजे’ या विचाराचा साथीदार तिच्या जीवनात आहे.
तिच्या ह्या ट्रेकचे संपूर्ण वर्णन तिने इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहे.
शुक्रवारी घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना साईनीच्या पाठीवर ट्रेकची बॅकपॅक असते. शनिवार-रविवार सायनी घरी नसण्याची तिच्या आई-वडिलांना सवय झालीय. ट्रेकिंग मधील धोक्याची आई-वडिलांना जाणीव आहे. ट्रेकला गेली नाही तर साईनी अस्वस्थ असते ही गोष्ट ते बखुबी जाणून आहेत. ‘ट्रेक हा इतर छंदासारखा एक छंद आहे. तो जोपासला पाहिजे’ या विचाराचा साथीदार तिच्या जीवनात आहे.
‘Girl on the Mountains’ नावाने सक्रीय असणाऱ्या ‘इंन्स्टाग्राम’
या सोशल साईटवरचे हे तिचे प्रोफाइल पेज.
त्यावरचे तिचे ट्रेकिंगचे फोटो पाहून बऱ्याच हौशी लोकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ट्रेक काय असतो? आम्हाला जमेल का? कोणाबरोबर जायचं? आंघोळ, बाथरूम, टॉयलेटची सोय असते का? रनिंग शूज चालतील का? कुठे जायचं ट्रेकला? एवढी ठिकाणे बघायला आहेत का? ट्रेकिंग सोबत काय घेऊन जायचं? ट्रेकिंग करून काय मिळतं? इ. इ.
त्यावरचे तिचे ट्रेकिंगचे फोटो पाहून बऱ्याच हौशी लोकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ट्रेक काय असतो? आम्हाला जमेल का? कोणाबरोबर जायचं? आंघोळ, बाथरूम, टॉयलेटची सोय असते का? रनिंग शूज चालतील का? कुठे जायचं ट्रेकला? एवढी ठिकाणे बघायला आहेत का? ट्रेकिंग सोबत काय घेऊन जायचं? ट्रेकिंग करून काय मिळतं? इ. इ.
लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे उलगडण्यासाठी आणि त्यांनी ट्रेकिंगकडे वळण्यासाठी, लिहिण्याची आवड असणाऱ्या साईनीने ‘गर्ल ऑन द माउंटन्स’ (www.girlonthemountains.com) नावानेच वेबसाईट सुरु केली.
तिने केलेल्या असंख्य ट्रेक मधील काही ट्रेकची सविस्तर माहिती शिवाय, ट्रेकसाठी लागणारे साहित्य, पहिला हिमालयीन ट्रेक कसा निवडावा, ट्रेक का करावा? पिरियड्स मधे ट्रेक करावा की नाही या विषयावर मार्गदर्शनपर लिखाण सुद्धा तिने केले आहे.
मुलांच्या बरोबरीने एन्ड्युरन्स असणाऱ्या मुली कमी आहेत आणि
ट्रेकिंगची लेव्हल वाढते जाते तशी मुलींची संख्या कमी होते हा साईनीचा अनुभव.क्रॉस
कंट्री रेंज ट्रेक्स, डिफिकल्ट ग्रेडचे ट्रेक, हाय एन्ड्युरन्स ट्रेक्स, २-३
दिवसांचे ट्रेक्स, हिमालयीन ट्रेक्स ही काही उदाहरणे. साईनी सांगते, “नाणेघाट ते
भीमाशंकर, १२० किमीचा ट्रेक. एका दिवसात ६० किमी अंतर पार केले जाते. १०-१५
जणांच्या ग्रुपमधे या ट्रेकला फारतर ३ मुली असतात”. २-३ दिवसांच्या ट्रेकच सामान कॅरी
करणे, ओव्हर नाईट ट्रेक असेल तर झोपण्याची जागा, सेफ्टी, बाथरूम, पिरियड्स असेल तर
त्याची मॅनेजमेंट, स्वच्छता सारख्या गोष्टी मुलींचे ट्रेकमधील प्रमाण कमी करण्यास
कारणीभूत होतात. साईनी सागंते, “मुलांच्या तुलनेत ह्या गोष्टी जास्त असतात”.
पिरियड्स बद्दल बोलता साईनी सांगते, “मुलींची धारणा असते की पिरियड्स मधे मी
‘वीकर’ असते किंवा तो एक ‘इलनेस’ आहे, माझ्या पोटात दुखते, त्रास होतो”. या विचाराने
मुली ट्रेकसाठी पुढे येत नाहीत. साईनी म्हणते, “मुलींनी अनुभवल्याशिवाय त्यांना ते
समजणार नाही. समजण्यासाठी मुलींसमोर उदाहरण पाहिजे. त्यांना पिरियड्स बद्दल माहित
आहे पण स्वत:वर त्या मर्यादा घालतात. तो एक ‘मेंटल ब्लॉक’ आहे. मला तो धोका
पत्करायचा देखील नाही. या भीतीने मुली ट्रेकला येतच नाहीत”. मुलींच्या मनातील ही
भीती नाहीशी होण्यासाठी ‘Trekking during your periods:
Yay or Nay?’ मार्गदर्शनपर ब्लॉग मधे ती लिहिते, ‘पिरियड्स असताना ट्रेक रद्द किंवा
पुढे ढकलण्यापेक्षा सॅनीटरी पॅड्सला पर्याय म्हणून ट्रम्पॉन्स वापरून पहा. सर्व
ऋतूत ते प्रभावी आहेत’.
रनिंगच्या तुलनेत ट्रेकिंग स्वागतार्ह आहे असे ती सांगते.
ट्रेकिंग मधे सांधे-स्नायू वर कमी प्रभाव पडतो; कोणत्याही वयासाठी ट्रेकिंग उत्तम
पर्याय आहे. “ट्रेकिंग इज अ गुड वे ऑफ फाइंडिंग सोल्युशन्स” असं ती सांगते. ट्रेकिंगकडे
लोकांनी आकर्षित होण्यासाठी ‘फोटो’ हे प्रभावी माध्यम आहे असे तिला वाटते.
ट्रेकिंग वरची पुस्तके आणि डॉक्यूमेंटरीज पाहणे तिच्या
जीवनाचा एक अविभाज्य भाग. अभ्यास, वाचन, नोकरी हाच कम्फर्ट झोन मानणारी धीरगंभीर साईनी म्हणते, “जीवनाला एकदम सिरीअसली घेता कामा नये”. स्वत:च्या कम्फर्ट झोन मधून
बाहेर येत, गडभटकंतीच्या वाटेवर स्वत:चा शोध घेत साईनीने स्वत:साठी आनंदाची आणि
हास्याची दारे खुली केली. ती फनी व्हिडिओज पाहते, म्युझिक ऐकत मरीन ड्राईव्हला चालते,
एखाद्या समारंभात रमते. “नोकरी, पैसा येत-जात राहणार. बरोबर राहणार आहे ते आपल
शरीर. शरीर आणि आपण आरोग्यसंपन्न असण महत्वाच आहे”.
फिटनेससाठी साईनी ‘रनिंग’ करते. मॅरेथॉन मधे सहभागी
होणे हे तिचे दीर्घकालीन ध्येय आहे. “रनिंग ओव्हर ट्रेकिंग ही निवड मी करणार नाही”
असं ती नि:क्षुन सांगते.
बीएमसी कोर्स झाल्यानंतर आता काही हिमालयीन एक्सपीडीशन्स
करण्याची तिची इच्छा आहे. वीस-तीस दिवसांच्या, क्लायबिंगचा समावेश असणाऱ्या, वीस
हजार फुटावरच्या एकस्पिडीशन्स हे तिचे स्वप्न आहे. उत्तराखंड मधील बंदरपुच्छ पीक आणि
नाशिक सातमाळ रेंज मधील चांदवड पिक्स (राजधर, कोलधर आणि इंद्राई इ.) करण्याची तिची
मनीषा आहे.
हिमालयातील ‘दयारा भूग्याल’ हा तिचा आवडता ट्रेक.
अंधार आणि स्क्रीची तिला भीती वाटते. खाण्यात गोड पदार्थ भयानक
आवडतात.
श्री. हरीश कपाडिया बरोबरच कॉनरॅड अॅन्कर (Conrad Anker) एड व्हीच्यूर्स (Ed Viesturs)
हे तिचे रोल मॉडेल!
स्वत:च वर्णन ती खूप सुंदर शब्दात करते, “She liked being alone, but she also feared loneliness. The dark made her
afraid, daylight made her feel exposed. She looked at the world as a stranger,
finding comfort in her own thoughts and ideas. Crowds were anxiety-inducing,
but also oddly reassuring. She had so much to share, to say but sometimes
invisible always held her back. Maybe she was meant for a different world’!
कैलेश पडवेकर, साईनी सोबत गेली तीन
वर्ष ट्रेक करत आहे. दोघांची भेट पहिल्यांदा झाली ती नाणेघाट ते भीमाशंकर
ट्रेकदरम्यान. सायनीविषयी तो सागंतो, "तिला सर्व गोष्टी स्वत:ला करायला खूप
आवडतात. ट्रेक उतराई थोडी स्टिफ असेल तर बसून उतरणारी, घाबरणारी; सायनी आज उतराई
स्टिफ असेल तरीही धावते, १५-२० किलोची बॅकपॅक ती सहज कॅरी करते, बीएमसी ची पूर्व
तयारी म्हणून ती रोज आठ किमी. धावायची, बीएमसीला शिकायचं आहे आणि शिकण्यात फिटनेस
हा अडथळा येऊ नये म्हणून तिने खूप परिश्रम घेतले, ट्रेकचा वेग वाढवा, स्टॅमीना आणि
क्षमता कळण्यासाठी रनिंग सुरु केले, जिम ला जायला वेळ नाही म्हणून घरच्या घरी
एक्सरसाईज सुरु केले. गेल्या तीन वर्षामध्ये तिने अफाट उंचीची कौशल्य आणि फिटनेस आत्मसात
केला आहे".
पुढे तो म्हणतो, "शिकण्यासाठी
सदैव तत्पर, इतरांना मदत करण्यास पुढे, स्वत:मधील कमतरता मानणारी, माहित नसणाऱ्या गोष्टी
कसोशीने माहित करून घेण्यास धडपडणारी, तिला जे बोलायचं आहे त्याच चित्र आपल्या
सशक्त लेखणीतून वाचणाऱ्याच्या मनात उतरवणारी, डोंगरांमध्ये कितीही काळ रमणारी,
चटकन राग येत असला तरी राग मनात न धरणारी, पौष्टिक अन्नाचा अट्टाहास बाळगणारी,
फोटोग्राफी आवडत असली तरी ट्रेक दरम्यान फोटो न काढता निसर्गामधे स्वत:ला विसरणारी
आहे साईनी".
"Perfect compartmentalization
of life तिने केलं आहे, Corporate life ते
Nomad life असं
तीन स्वत:ला खूप छान switch केलेलं आहे. Corporate life मधे ती perfect आहे.
Personal Professional आयुष्याचे अतिशय सुंदर
संतुलन तिने साकारलेले आहे. तिचे लेखन कौशल्य असं आहे की ते वाचताना तिच्यासोबत
आपलाही ट्रेकप्रवास होतो. Literature Reading तीच
जबरदस्त आहे. Open स्वभाव आहे, कामाशी काम, एखादी गोष्ट नसेल करायची तर
अजिबात करणार नाही, खूप वेगाने ट्रेक करते, एखादी गोष्ट तिला करायची असेल तर ज्या Dedication नी ती ते करते ते Dedication इतरांनी तिच्याकडून शिकण्यासारख
आहे, ट्रेक आणि त्याच्यावरच्या लिखाणामुळे खूप लोकं तिला ओळखतात पण ती आहे तशीच
आहे. अशी Inspirational, Well
organized, Resourceful मुलगी
आपल्या जीवनात आहे हे छान फिलिंग आहे" रुपाली कामतेकर च्या साईनी बद्दलच्या ह्या सुरेख
भावना!
तिच्या मैत्रिणीच्या काही भावना आणि तिच्यावर लिहिलेला लेख.
साईनी, ट्रेकिंगचा ध्यास जाणीवपूर्वक घेतलेली मुलगी. त्यासाठी स्वत:च्या जीवनशैलीच नियोजन तीन बखुबी जमवलं. आठवड्यातून एकदा तरी इन्स्टाग्राम पेज वर एखाद्यातरी गडकिल्ल्याविषयी लिहायचं हा नियम ती पाळते. इन्स्टाग्राम वरची पोस्ट वाचताना तिचा स्वत:चा शोध आपल्या अंतरंगाला भिडतोच, शिवाय तिला शोधण्याचा आणि समजण्याचा आपला प्रवास आपल्याला नकळत समृद्ध करतो.
साईनी, ट्रेकिंगचा ध्यास जाणीवपूर्वक घेतलेली मुलगी. त्यासाठी स्वत:च्या जीवनशैलीच नियोजन तीन बखुबी जमवलं. आठवड्यातून एकदा तरी इन्स्टाग्राम पेज वर एखाद्यातरी गडकिल्ल्याविषयी लिहायचं हा नियम ती पाळते. इन्स्टाग्राम वरची पोस्ट वाचताना तिचा स्वत:चा शोध आपल्या अंतरंगाला भिडतोच, शिवाय तिला शोधण्याचा आणि समजण्याचा आपला प्रवास आपल्याला नकळत समृद्ध करतो.
साईनी एक उदाहरण आहे, जीवनाच्या कोणत्याही वळणावर एखादा
'ध्यास' दस्तक देऊ शकतो. दस्तक ऐकून त्या वाटेवर आपल आयुष्य फुलवणं हे आहे आपल्याच
हातात! "स्वत:चा शोध" सुरूच ठेवणं हीच खरी अंत:प्रेरणा!
८ डिसेंबर २०१८ रोजी, पुण्यात साईनीच्या हस्ते तिच्या ब्लॉगचे प्रकाशन करण्यात आला. त्याची ही काही छायाचित्रे:
]
ब्लॉग रिव्ह्यू करणारा आमचा मित्र स्वप्नील खोत आणि साईनी चा मुंबईचा ट्रेकमेट यज्ञेश गंद्रे या सोहळ्याला उपस्थित होते.
आशा करते हा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि साईनी चा ट्रेक प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. ब्लॉग वाचून अभिप्राय नक्की द्या. वाट पाहीन तुमच्या अभिप्रायाची!
पुन्हा भेटूच ...अशाच एका हरहुन्नरी, ट्रेक ने मंत्रमुग्ध झालेल्या मुलीच्या ट्रेक ब्लॉग मधून!
तोपर्यंत...
Keep Trekking
Keep Exploring
Keep Blogging
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
No comments:
Post a Comment