गंगा-यमुना नदी शिल्पांचे पावन तीर्थ -टाकळी ढोकेश्वर लेणी आणि शिवमंदिर

टाकळी ढोकेश्वर! नावचं पहिल्यांदा ऐकत होते!

कसे असेल हे मंदिर? काही नाविन्य असेल का? काही वेगळी शिल्प असतील का? का बांधले असेल इथे हे मंदिर?...

पुणे-राळेगणसिद्धी-कान्ह्र्र पठार -टाकळी ढोकेश्वर असा प्रवास!

वातावरण एकदम आल्हाददायक! सूर्याने आज काळे मेघ प्रखर केलेले! हलकासा गारवा! चहूकडे हिरवाई! गाडी पुढे जातेय...मी अंतर्मुख होतेय....

प्रवासात जाताना एक रस्ता गेला टाकळी ढोकेश्वर कडे  तर विरुद्ध रस्ता कल्याण शहराकडे...

पैठण -कल्याण हा प्राचीन व्यापारी मार्ग! टाकळी ढोकेश्वर ह्या मार्गावरील एक गाव! म्हणूनच कदाचित इथे लेणी बांधली असावीत.

राष्ट्रकुट काळातील साधारण आठव्या ते नवव्या शतकातील ही लेणी अशी माहिती मिळाली.

गाडी थांबली. उतरून पहिले.डोंगरात पहुडलेली लेणी आणि मंदिर! दगडी पायऱ्या वर जायला......
काही पायऱ्या चढून गेल्यावर उजवीकडे लागले एक छोटेखानी शिवमंदिर आणि समाधीस्थल!मंदिराचे द्वार इतके छोटे की गर्भगृहात प्रवेश करायला जरा कष्टच पडले!गर्भगृहात आहेत शिवपिंडआणि एक शिलालेख!मंदिरासमोर एक चौथरा... ज्यावर पादुका आहेत. साधारणत: समाधीस्थळावर अशा पादुका पाहवयास मिळतात.

काही पायऱ्या चढून जाताच मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार ...प्रवेश द्वाराकडे जाताना डावीकडे ठेवले आहे एक शरभ शिल्प. शंकराने धारण केलेले काल्पनिक पशूचे रूप म्हणजे शरभ! त्याची कथा अशी सांगतात की, हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर नृसिंह उतला-मातला. त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली'. शेवटी त्रस्त झालेल्या लोकांनी शंकराची प्रार्थना केली. प्रार्थना ऐकून शंकराने नृसिंहाला शिक्षा करण्यासाठी पशु, पक्षी आणि नर यांची शक्ती एकत्रित केली. लोकांच्या समोर ते ज्या रुपात प्रकट झाले ते हे शरभ रूप!ह्या प्रवेशद्वारावर अजून एक शिलालेख....मुख्य मंदिर आणि लेणीला नेणाऱ्या वळणाकृती  पायऱ्या मला खासच भावल्या....मुख्य मंदिराचा बाहेरचा भाग पाहून मला घोरावडेश्वर मंदिराची बाह्य रचना आठवली. बरेचसे साम्य वाटले.मंदिराबाह्य भाग पाहिल्यास  दृष्टीस येते लेणी आणि लेणी कडे नेणाऱ्या दगडात कोरलेल्या खोबण्या...मंदिराच्या आवारातून दिसणारा खालील नजारा....
छोटेखानी मंदिरासमोरील समाधीस्थळ ह्या फोटोत जास्त स्पष्ट दिसते.

मंदिराच्या बाह्य भिंतीवर कोरलेल्या गंगा आणि यमुना शिल्प्नांनी आकृष्ट केलं. मंदिराच्या डावीकडे आहे कासवावर आरूढ यमुना...उजवीकडे आहे मगरीवर आरूढ गंगा!
नदीच्या प्रतीकात्मक ह्या शिल्पाकृती! "पवित्र  जलाने पाय स्वच्छ करून मगच मंदिरात प्रवेश करा" हाच भावार्थ सांगणाऱ्या !

पौराणिक कथा वाचल्या तर यमुना नदीचे वाहन आहे कासव आणि गंगा नदीचे मगर! मगर अत्यंत चपळ, वेगवान, प्रसंगी भीषण आणि पाण्यातल्या इतर छोट्या-मोठ्या प्राण्यांना संरक्षण देणारी असते. तद्वतच आहे गंगा नदी! यमुना गंगेची सहायक नदी!

गंगा-यमुनेच्या ह्या शिल्पाकृती खूप अनोख्या, नाविन्यपूर्ण वाटल्या...

मंदिराच्या बाहेरील खांबावर प्राणी कोरलेले सुरेख खांब ...मंदिराच्या आत प्रवेश केला आणि डावीकडील भिंतीवर कोरलेल्या दिसल्या सप्तमातृका! पायाजवळ त्याची वाहने...प्रत्येकीच्या डोक्यावर पवित्र वृक्ष! अतिभव्य प्रमाणात पूर्ण भिंतीवर कोरलेल्या सात मातृका मी आतापर्यंत इथेच पहिल्या..सप्तमातृका सोबत उजवीकडे गणेश आणि काल यांचे शिल्प देखील कोरले आहेत.

पुढे दिसल्या काही वीरगळ...मुख्य मंदिराचा प्रदक्षिणामार्ग ....दगडात कोरलेला...खरतर गुहाच ही....गुहेत कोरलेलं मंदिर....उजवीकडून  प्रदक्षिणा घालताना अजून एक नंदी मंडप ....मंडपात  अतिभव्य नंदीशिल्प..


नंदी मंडप...नंदिशिल्पाच्या समोर मुख्य मंदिराचे उपद्वार..... उपद्वारातून शिवपिंडीचे चे दर्शन  केवळ अलौकिक!उजवीकडे दोन स्तंभ असलेल्या उपगर्भगृहात नृत्य करणाऱ्या शिवाचे कोरीव शिल्प..नागशिल्प..जणू शिवाचा रक्षणकर्ताच!मुख्य मंदिराच्या मंडपातील नंदीशिल्प..नंदी मंडपातील नक्षीदार स्तंभ....नंदिशिल्पासमोर गर्भगृह.....फुलांनी सजवलेली शिवपिंडी...गर्भगृहाच्या भिंतीवर द्वारपाल....


डावीकडील द्वारपाल सोबत आहे भैरव ची मूर्तीमंदिराच्या मुख्य द्वारातून लेणी मधे कोरलेले शिवमंदिर..


नाविन्यपूर्ण गंगा-यमुना नदी शिल्प  पाहून कृतार्थ  मी....


मंदिर उतरताना दिसणारा पायऱ्यांचे अनोखे सौंदर्य......


गडपरिसरात दिसलेली काही सुंदर पुष्पे....


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

संदर्भ: गॅॅझिटीयर

फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे यांनी दिनांक २८ जुलै २०१९ रोजी ही वारसा सहल आयोजित केली.
खास आभार: शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य

टाकळी ढोकेश्वर टीम:


💗💗💗💗💗💗💗💗
1 comment:

ydpxswifmp said...

What is essential to recollect with that's that totally different games can often have totally different payout charges. With Super Slots, gamers 점보카지노 can select between either the Black or Red Casino. Both of these stay dealer game options embody a wide variety|all kinds} of games. Super Slots was created in 2020, making it one of many latest on-line gambling sites. This on-line casino is located in Panama and it is licensed by the Panama Gaming Commission.