काल रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी ढाकोबा ट्रेक केला. त्याचा थकवा अजूनही आहे. ब्लॉग लिहायला घेतला आणि पहिला भाव मनात दाटून आला तो हा की "किती लांबलचक ट्रेक होता. ढाकोबा गिरीशिखर गाठायला जवळजवळ चार तास लागले. ढाकोबा शिखर दिसले ते जवळ जवळ तीन तास चालल्यावर.! बापरे. का कुणास ठाऊक पण कळसुबाई शिखरापेक्षाही विस्तृत वाटला हा ट्रेक /ट्रेल! शिखराची उंची आहे साधारण ४१०० फुट.ते पार करताना दमछाक झाली.डोळ्यासमोर येतय ते दोन छोटे पाण्याचे झरे, जंगलातून जाणारा मार्ग, तीन झोपड्या, दगडमाळ, ढाकोबा देव मंदिर आणि ढाकोबा शिखर! पण सविता तुला मानायला हवं की अजून तुझा स्टॅॅमीना शाबूत आहे. हा थोडी थकलीस कारण रोजचा व्यायाम नाही आणि पहिल्यासारखे आता दर आठवड्याला ट्रेक ही करत नाहीस". असो.
ट्रेक सुरु झाला तो जुन्नर मार्गे भिवडी बू|| गावातून. सकाळी १०.३० ची वेळ. काळे मेघ आणि सोनेरी ऊन यांची' अफलातून निसर्गकिमया.
भिवडे धरणाच्या काठाकाठाने, शेताच्या बांधावरून आम्ही चालत होतो. धरणाचा नितळ, स्तब्ध आणि शांत जलाशय साथ करत होता. बांधावरची शेत पिके वाऱ्याच्या झुळुकीसरशी डोलत होती. वाऱ्याची थंडगार झुळूक अंगाला स्पर्शून गेली की एकदम स्फुर्तील वाटत होत.
झेंडूची लागवड, गुरांचा चारा, नाचणीची शेती, मधूनच डोलणारी फुले.....
धरण काठी कपडे धुवायला आणि भांडी घासायला जाणाऱ्या स्त्रिया आणि सोबत छोटी मुले....
"देवाला चालला का?" असं कौतुकाने विचारणारे स्त्री-पुरुष ग्रामस्थ. आमचं उत्तर "हो. वर शिखरावर पण जाणार आहोत"!
बांधावर आडवलेल्या थंडगार पाण्यातून जाताना माझ्या जीवाने काढलेले शब्दोदगार "अहाहा, काय छान वाटतयं....."! नुकत्याच केलेल्या शुक्रवारच्या जंगल वॉक मुळे अग्नीसम ठणकत असणाऱ्या माझ्या तळपायांना थंडगार पाण्याची फुंकर जणू मिळाली!
अशातच झाडाला रबरी पाईपला लगडून कोब्रा विसावलेला. एकदम सुस्तावस्थेत!
रेड व्हेन्तेड बुलबुल, कधी लाईटच्या तारेवर तर कधी निळ्या आसमंतात भरारी घेताना....
हिरव्या-पोपटी गवत मखमली वर उडणारी असंख्य फुलपाखरे....
काही प्रकारचे मशरूम्स.....
बहरलेल्या फुलांचा आनंद घेत जंगलातून मार्गक्रमण करताना विविधरंगी फुलांची ही जादुई दुनिया होती किती आल्हाददायक ! हळुंद, करटूले, सोनकी, छोटा-मोठा कावळा, गुलाबदाणी, चीरायत, कानपेट, काप्रू, रानतेरडा, पोपटी, कुर्डू, लाल मंजिरी, तुतारी, .....किती म्हणून फुलांची नावे घ्यावी
करटूलं पाहिलं.
भोपळ्याच्या वेलाला फुल येत अगदी तसच दिसायला. फक्त आकार लहान. राजकुमार ने सांगितल ते करटूलं आहे. त्याची भाजी करतात. ते सोनेरी रंगाच छोटसं फुल आणि त्याच नाव उच्चारून एक गाणं आठवल ,
अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट लावा
दुसरा छोटा झरा लागला. दगडा दगडा वर पाय ठेवत पार करण्यास किचिंत अवघड. सरळ पाण्यातून गेले. आता जंगलाचा भाग सुरु झाला. थोडी तीव्र चढाई. काही अंतरावर दोन झोपड्या दिसल्या. काही अंतर पार केल्यावर पुन्हा एक झोपडी. गुरांना चारा -पाण्यासाठी हे लोकं शेतात येऊन राहिलेले. एक बाबा झोपडीतून बाहेर आले. "देवाला चालले का? जा असंच सरळ वर" अस. सांगितलं.
आता एक पठार/माळरान लागल. पठारावर सोनकी, लाल मंजिरी, तुतारी इ. फुले दिसली.
तुतारी ओल्या माळरानावर हे फुलं फुलतं. गवताजवळ वाढतं. आपली मुळं गवताच्या मुळात खोचून गरजेपुरती अन्नद्रव्य शोषून घेत. राजकुमार ने सांगितलेली माहिती ऐकली पण तुतारी नाव एकूण माझ्या मनात एक कविता चमकून गेली. कवी केशवसुतांची कविता...
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी ||
सकाळी जाताना ही फुले जमिनीकडे झुकलेली . सायंकाळी परतीच्या वेळी आकाशाकडे पाहत छान फुलेलेली!
निसर्गाची गंमत वाटली. एका हाकेच्या अंतरावर जिथे सुंदर, नाजूक, मनप्रसन्न करणारी फुले फुलतात, तिथेच हाकेच्या अंतरावर कोब्रा सारखा घातक, विषारी साप ही वास करताना दिसतो, तिथेच काही हाकेच्या अंतरावर लालबुड्या बुलबुल सारखा मधुर आवाजात गाणं गाणारा पक्षी देखील पाह्यला मिळतो. किती विभिन्न निसर्गयात्री इथे एकत्र प्रवास करतात.
या माळरानावर लाल मंजिरी सगळीकडे फुलली होती. जांभळी मंजिरी अजून शरमलेली!
माळरानावर समोर दिसत होता ढाकोबा
तर पलीकडे ढाकोबा देव मंदिर!
एक समाधान की दोन-अडीच तासांच्या चढाई नंतर ढाकोबाचं दर्शन झालं. शिखरावर जाण्यासाठी निघालो.
काही अंतरावर आला तो दगडाचा माळ! फुलांचा माळ ऐकल होतं पण दगडाचा माळ? ढाकोबा ट्रेकच हे एक वैशिष्टय!
राजकुमार म्हणे, "पाहून बसा. ह्या दगडामध्ये फटीत साप विसावून असतात".
दगडीमाळ ला वळसा घालत पुढे निघालो. ढाकोबाचे शिखर धुक्यात लपेटलेले. धुक्याच्या विहरण्याने कधी शिखर दिसेनासं व्हायचं तर कधी लख्ख दिसायचं!
ह्या माळरानावरील नजारा इतका प्यारा की तासनतास तिथेच बसावं. धुक्याची तरलता आणि सोनकीच्या फुलांची रेलचेल....
आता शिखर जवळ येऊ लागल...
किचिंत चढाई चढून गेल्यावर शिखराचा पायथा आला. शिखर विहरणाऱ्या ढगांमध्ये लपेटले. कधी शिखर स्पष्ट दिसत होते तर कधी धुक्यात गुडूप झालेले....
पठारावर सर्वत्र सोनकी फुललेली ...धुके दाटून आलेले....
या सुंदर धुंद वातावरणात फक्त आम्हीच! बेधुंद! वेडावलेले! निसर्गाच्या सौंदर्याने पुलकित झालेले......
धुक्याच्या चादरीने कोकण, दारया घाट आणि दुर्ग दर्शनाने सुखावलो नाही इतकचं काय ते!
सोबतीला चविष्ट मेथी पराठा, लोणचं आणि चटणी!
हा आस्वाद घ्यायला ३.३० वाजले!
ढाकोबा, गड/किल्ला प्रकारात येत नाही असं तज्ञांच म्हणण. कारण त्याला त्या प्रकारात बसणारे अवशेष नाहीत.
टेहळणी शिखर असावे. कारण कोकणात उतरणारे घाटवाट व्यापारी मार्ग इथून नजरेच्या टप्प्यात!!
ढाकोबा शिखर! एकमार्गी जवळजवळ तीन ते चार तासांचा ट्रेक आहे (निसर्गातील पाना-फुलांचा मनमुराद आनंद घेत. नुसती तंगडतोड नाही ). पुढे साधारण दोन तासावर दुर्ग! दुर्ग -ढाकोबा ही जोडगोळी! आसमंतात एकमेकांच्या साथीला सावलीसारखी उभी, दुर्ग-ढाकोबा जोडी!.
ढाकोबा शिखराचा निरोप घेऊन मंदिराच्या दिशेने निघालो. प्रशांतची बाईक रस्त्यावर घसरून नुकताच अपघात झालेला. गुडघे आणि हाताला मार लागलेला. अशा शारीरिक अवस्थेतही हा मुलगा ट्रेक ला आलेला. त्या दुखापतीत ट्रेक करताना पाहून मी त्याला हात जोडले.
ढाकोबा मंदिर आले. नंदी आणि शेंदूर चर्चित देव! नमस्कार करून परतीच्या वाटेला निघालो.
झोपडीजवळ यायला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले. झोपडीतून बाबा बाहेर आले. म्हणे," लईच वेळ लागला. सकाळचान गेलेले सांज झाली". आमच उत्तर, "देवाला जाऊन वर शिखरावर पण जाऊन आलो".
बाबांचा निरोप घेऊन निघालो. मी तर आता जाम थकले होते. यावेळी कंबर दुखू लागली. पण उतरण्यासाठी कंबर खचावीच लागली.
झोपड्या गेल्या, एक झरा लागला, भिवडी धरण आले, झेंडूची फुलबाग आली, दुसरा झरा लागला, गाव जवळ आले...
गावात पोहोचता पोहोचता दिवाबत्तीची वेळ ही सरून गेली....
भिवडी गावाला निरोप दिला संध्याकाळी सात वाजता!
थकलेल्या शरीर गाडीत पहुडले...
नारायणगावात प्रसिद्ध मसाला दुध पिऊन गाडीची चाके पुण्याकडे धावली...
ट्रेकचा मॅॅप पहिला तेव्हा मी हादरले...
१५.३ किमी अंतर, ८.१० तास आणि १२४२ मी. उंची😖 आहे न कमाल......असो.
सकाळी पाच वाजता निद्रेतून उठलेल्या घरात , रात्री अकरा वाजता निद्रिस्थ होण्यासाठी शरीर आसुसले!
फोटो आभार: ट्रेक टीम
खास आभार: माची इको ऍड रुरल टुरिझम, पुणे (राजकुमार आणि प्रशांत) आणि ट्रेक सहभागी

हलूंद |
सोनकी |
पोपटी |
पंद |
गुलाबदाणी |
करटूलं पाहिलं.
करटूलं |

तुतारी |

लाल मंजिरी |

No comments:
Post a Comment