वारसास्थळ भेट: पहिला अनुभव, २६ जानेवारी 2019


शाळुंका, अयोनी-सयोनी पद्धतीची शिवलिंग, दाढी-मिशी असलेले शिवमुख, शिल्पपट, सप्तमातृका, अष्टमातृका, बैल आणि मानवाचे एकत्रित रूप असणारे अग्नी-वृष, खांबावर  कोरलेले शिवदंड आणि काळसर्प, शिवपिंडी वरील उमलत गेलेली कमलदले...

बापरे बापरे.....

देणाऱ्याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी ||

गदिमांच्या ह्या गीतासारखी माझी अवस्था झाली!

सातारा जिल्यातील देगाव जवळील  पाटेश्वरच्या पायथ्याशी येऊन साधारण दीड ते दोन किमी पायवाटेने चालत गेल्यावर लागला पाटेश्वर  परिसर. प्राचीन लेण्यामधील स्थापित आणि कोरीव अशी वैविध्यपूर्ण शिवलिंग, नंदी आणि देवी-देवतांच्या कोरीव प्रतिमा  पाहून मी चक्रावून गेले.

वाई तालुक्यात, कृष्णा आणि वेण्णा नदी संगम काठावरील संगम आणि क्षेत्र माहुली येथील हेमाडपंथी पद्धतीत बांधलेलं विश्वेश्वर आणि संगमेश्वर मंदिर!  

किकली येथील भैरवनाथ मंदिर!

.........अमुल्य ठेवा अशी ही वारसा स्थळे !

"फिरस्ती महाराष्ट्राची" अंतर्गत, शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य या दोन अभ्यासू मुलांनी आयोजित केलेली "पाटेश्वर आणि संगम माहुली" आणि "किकली" येथील भेट  (हेरीटेज वॉक) माझ्यासाठी प्राचीन लेणी आणि मंदिराच्या अभ्यासाची दारे खूली करणारी ठरली!

पाटेश्वर तेथील शिवलिंग जसे खास तसेच खास नंदी शिल्प! सर्पाने पायाला विळखा घातलेले नंदीशिल्पामधे सर्पमुख अगदी स्पष्ट दिसत आहे.

प्रत्येक शिल्प अत्यंत सूक्ष्मपणे न्याहाळणे आवश्यक आहे. त्यासाठी तेवढा वेळ देणेही तीतकेच  गरजेचे. तेव्हाच ह्या सर्व शिल्पांचा अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेता येतो. .

शिल्पांची बैठक स्थिती, हाताची मुद्रा, पायाची स्थिती, डोळ्यातील भाव, हातातील आयुधे, अंगावरील दागिने, वस्त्र, केशरचना इ. ह्या सर्व गोष्टी अगदी सूक्ष्मतेने आणि अभ्यासपूर्ण नजरेने पहिल्या तरच ह्या वारसांचा मागोवा घेतल्याचे साफल्य होईल, असे मला जाणवले. 

देवी-देवता, त्याची आयुधे, शिवपुराण-विष्णुपुराण, बौध्द कालखंड इ. पुर्ववाचन शिल्पाचा अर्थ जाणून घेण्यास नक्कीच मोलाचे ठरते.

शिल्पमागचे भाव जाणून घेणे आत्यंतिक महत्वाचे. तेव्हाच त्याचा अभ्यास होतो अर्थपूर्ण !

वारसास्थळे मध्ये, प्राचीन मंदिरे, लेणी इ. मध्ये फोटो काढण्याची परवानगी असेल तर फोटो नक्की कशाचे काढायचे हा एक विचाराचा विषय आहे. मला हे जाणवले कि फोटो दोन प्रकाराने काढले जावू शकतात, एक अभ्यासासाठी आणि दुसरे कलात्मकतेच्या दृष्टीने! 

बारकाईने ही शिल्प न्याहाळताना एक गोष्ट जाणवली ती ही की ह्या शिल्पाचे फोटो काढताना शक्य असेल तितके आठ ही बाजूंनी काढणे महत्वाचे आहे. अगदी वरून, खालून, कडेने, पुढून, मागून, खालून ई. त्यामुळे शिल्पावरील कोरीव काम अर्थपूर्ण होण्यास मदत होते.

एखादे आयुध, शिल्प मुख, हात, पाय इ. सारख्या गोष्टींचे क्लोजअप घेतले तर ते अभ्यासण्यासाठी जास्तच उपयोगी होतील.

लेण्यां बघण्यासाठी जाताना विजेरी अर्थात टॉर्च जवळ बाळगणे फोटो घेण्यासाठी फायदेशीर ठरते.

अभ्यासकांचे लेखन आधी वाचून गेलात तर कोरीव शिल्प समजून घेण्यास अधिक मदत होते. 

अभ्यासक म्हणजे ज्यांनी सर्वांगाने अभ्यास केला आहे. 

कलात्मकता जाणून फोटो काढणे हि एक कलाच बरका. फोटो पहिल्या पहिल्या तिथे भेट देण्याची इच्छा व्हावी!

अशा प्रकारची वारसा सहल माझी पहिलीच! थोडा वेळ घेते अशा प्रकारचा वारसा समजून -उमजून लिहिण्यासाठी!

सध्या तरी काही फोटो पोस्ट करत आहे.....

या वारसा सहलीच्या निमित्ताने शंतनू आणि अनुराग ची झालेली ओळख ही माझ्यासाठी खासच!ट्रेक तर सुरु राहतीलच.......

परंतु अशा प्रकारच्या वारसा सहलीत माझे पदार्पण हे माझ्यासाठी नक्कीच माहितीसंपन्नदायक......

पाटेश्वर लेणी:


संगम माहुली:किकली:👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

संदर्भ:

काही माहितीपर लेख नंतर वाचण्यात आले त्याची हि सूची,

पाटेश्वर-एक शोध निबंध आणि साताऱ्याच्या मुलुखात ही आदित्य फडके यांची पुस्तके आणि www.sahyadrigeographic.com ह्या संकेतस्थळावर विवेक काळे आणि सागर बोरकर यांचे लेख उपलब्ध आहेत.


पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान: ५० फक्त in कलादालन31 Aug 2011

कातळकला : पाटेश्वरचे ‘शिव’लेणे: अभिजित बेल्हेकर - शनिवार, ३ सप्टेंबर २०११

सातारा जिल्हा गॅॅझेटीयर-माहुली

सातारा जिल्हा गॅॅझेटीयर-किकली

मिसळपाव-प्रचेतस भटकंती

शंतनू आणि अनुराग लिखित फिरस्ती महाराष्ट्राची हे पुस्तक भेटूयात पुढच्या वारसास्थळ भेटीला!

लवकरच......


No comments: