२० जून रोजीच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कात्रज ते सिंहगड (ट्रेकच्या काही टेकड्यांची चढाई-उतराई करावी अशी इच्छा!
प्रशांत नुकताच "बेसिक माउंटनिअरिंग" कोर्स करून आलेला. केटूएस ट्रेक त्याचाही जीव की प्राण!
ओंकार ट्रेकसाठी तयार!
सकाळी ५ वाजता घरातून निघून, ५.३० ला कात्रज जुना बोगदा गाठला.
वाघजाई मातेचे दर्शन घेऊन ६ वाजता ट्रेक सुरु केला.
आदल्या दिवशी पाऊस बरसलेला. हिरवाई फुलायला आलेली. थोडेसे काळेभोर दाटून आलेले ढग. वातारणात किंचितसा बोचरा गारठा. गार वारा.
आसमंतात फक्त आम्ही तिघे!
आजच्या ट्रेकच उद्देश होता ठरवलेल्या वेळेत होणाऱ्या टेकड्यांच्या चढाई-उतराईचा आनंद घ्यायचा!
पावसाने ओथंबलेला कात्रज चा जुना बोगदा अधिकच मोहक वाटला. त्या बोगद्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याची इच्छा आज पूर्ण झाली.
दगडी फरश्यानी आच्छादलेला नाला ओलांडून चढण्यास सुरुवात केली. वाघजाई मातेचे दर्शन घेऊन लगेचच ट्रेक ला सुरुवात केली.
थोडसं अंतर चालून गेलो. गवताच्या कुरणात फुललेली मोहक फुले वाऱ्यावर डोलणारी आणि दवबिंदूने शहारलेली.
निसर्गाने आनंदाची उधळण केली. मन तजेलदार करणारे वातावरण! नीरव शांतता, वाऱ्याच्या हिंदोळ्यावर लयीत डोलणारी झाडांची पाने, पावसाच्या शिडकाव्याने शांत पहुडलेली जमीन, ओली भुसभुशीत काळीभोर माती, घसारा दबलेला, रुक्ष डोंगर हिरवाईने नटलेले, नव-कोंब फुटलेले, फुले बहरलेली ....
पहिल्या टेकडीच्या पायथ्याला आलो. टेकडी ला बाय-पास किंवा ट्राव्वर्स आहे. काहीजण त्याचा वापर करताना दिसले. आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली.
थोडसं थांबत थांबत टेकडी चढल्यावर पुणे शहराचा जो काही नजारा दिसतो तो एकदम मनमोहक! रस्ते डोंगरांना भिडलेले की डोंगरातून रस्ते निघालेले ....कॉन्क्रीटने व्यापलेले पुणे एका पोल्युशन विरहीत हिरव्यागार टेकडीवरून पाहण्याचा आनंद .....वाव!
टेकडीवर तुफान वारा होता....ताजेतवाने करणारा!
ही टेकडी उतरणे आय अवघड प्रकार आहे ते पुन्हा जाणवले. १-२ पॅॅचेस असे आहेत जिथे अगदी काळजीपूर्वक जाव लागले. तरी पावसाने माती दबलेली असल्याने घसारा इतका धोकादायक वाटला नाही.
दुसऱ्या टेकडीकडे वाटचाल सुरु झाली. आता वाऱ्याचा वेग वाढला होता. अत्यंत आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा वारा!
दुसरी टेकडी उतरली ती चक्क घसरूनच!
ह्या दोन टेकड्या प्रचंड उंच. त्यांच्या चढाईने पावसाळ्यातही घाम काढला.
तिसऱ्या टेकडीच्या पायथ्याशी पाऊस आला. प्रशांत ने आणलेल्या हेल्दी खाऊ खाल्ला...टोमॅॅटो, काकडी, गाजर....
आता परतीला लागलो. दुसऱ्या टेकडीला ट्रावर्स मारला. तो पण तितकासा सोपा नव्हताच! अरुंद वाट, वाढलेले गवत आणि सुसाट्याचा वारा.....
मंदिराजवळ आलो तेव्हा १० वाजले होते. चार तासात रमत रमत दोन टेकड्यांची चढाई-उतराई केली. वातावरणाचा आनंद घेतला.
केटूएस ट्रेक अजूनही पुरेसा समजला नाही ह्याच बोध यावेळच्या दोन टेकड्यांनी दिला! नाही समजला क्षमतेनुसार, नाही तो समजला आजूबाजूच्या दिसणाऱ्या पुण्याच्या परिसरानुसार, नाही अजून समजला तो तिथल्या हवामानानुसार, नाही अजूनही समजला तो तिथे उमलणाऱ्या फुलांच्या विविधतेनुसार, नाही आजही समजला तो तिथे चरायला येणाऱ्या गुरांच्या अधिवासानुसार, नाहीच समजला तो अजून "मला का आवडतो" याच्या कारणानुसार!
पन्नाशीच्या वाढदिवसासाठी पूर्व तयारी तर झालीच पण इच्छा देखील पूर्ण झाली!
बघू केटूएस ट्रेकचा अनुभव आणि उलगडा पुन्हा कधी योग जुळवून आणतोय !
तोपर्यंत मला पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

No comments:
Post a Comment