श्री. आनंद पाळंदे सर यांचे “डोंगरयात्रा” पुस्तक हाती आलं आणि “निमगिरी” या गिरीदुर्गाबद्द्ल लिखित माहिती शोधण्याचा माझा प्रयास सार्थ झाला म्हणून हा ब्लॉग लिहिताना अत्यानंद होत आहे! जुन्नर तालुक्यातील हा माझा पहिला ट्रेक, पहिले गिरिभ्रमण! फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसणारा आणि तसा “ऑफ-बिट” हा जुळादुर्ग निमगिरी!
सरांच्या “डोंगरयात्रा”
सह्यपर्वतावरील पुस्तकात “हडसर-निमगिरी-सिंदोळा” ह्या हाटकेश्वर रांगेतील
पर्वतांच्या हिलवॉकिंग विषयी त्यांनी लिहिले आहे की, आरंभस्थळ आहे जुन्नर, जिल्हा,
पुणे आणि गन्तव्यस्थळ आहे खुबी, जिल्हा, पुणे. पुणे-नाशिक महामार्गावर
नारायणगावाशी जोडलेले जुन्नर तर खुबी हे आळेफाटा, ओतूर-माळशेज घाट मुरबाड (जि.
ठाणे) या राज्यमार्गावरील स्थळ आहे.
“गड किल्ले महाराष्ट्राचे” या
प्रमोद मारुती मांडे सर लिखित पुस्तकात निमगिरी दुर्गाविषयी माहिती आढळते. डावीकडे
“हनुमंतगड” आणि उजवीकडे “निमगिरी”!
हनुमंतगडाबद्दल या दोन्ही पुस्तकात माहिती नाही
मग निमगिरीचाच उल्लेख का? हा प्रश्न मला पडलाचं! असो.
Find Your Own ways (FYOWs) हा ट्रेकिंग ग्रुप आणि
साधारण २६ ट्रेक सहकाऱ्यांसोबत ह्या जुळादुर्गाला भेट देण्यासाठी निघाले होते.
“डोंगरयात्रा” पुस्तकात ह्या पर्वताचा मार्ग लिहिताना लिहिले आहे की, “माणिकडोह
मार्गाने पश्चिमेला चालू लागावे. शिवनेरी दुर्गाच्या उजवीकडून (उत्तर) आपटाळे
मार्ग सोडून माणिकडोह धरणापाशी यावे (१/२ तास). उत्तरेला हडसर दुर्ग (१०२८ मी) ४००
मी. उंचावला आहे. हडसरची एक सोंड माणिकडोह धरणाला भिडली आहे. या सोंडेवरील
गाडीमार्गाने चढावे. हा मार्ग हडसरच्या पायथ्यातून निमगिरीपर्यंत जातो!”.
जुन्नर-आळेफाटा-शिवनेरी मार्गाने
आम्ही निमगिरी बेस व्हिलेजला येथून ठेपलो. ट्रेक सहकाऱ्यांची ओळख परेड झाली.
निमगिरी ट्रेकबद्दल माहिती देताना निखील बोधाले या FYOWs च्या कोआर्डीनेटरने काही सूचना दिल्या जसे, “घनदाट जंगल आहे, वाट चुकू शकते म्हणून गटात राहणे”. हनुमंतगड हा चढायला टेक्निकल आहे असं याच्या बोलण्यात आलं! असो.
निमगिरी ट्रेकबद्दल माहिती देताना निखील बोधाले या FYOWs च्या कोआर्डीनेटरने काही सूचना दिल्या जसे, “घनदाट जंगल आहे, वाट चुकू शकते म्हणून गटात राहणे”. हनुमंतगड हा चढायला टेक्निकल आहे असं याच्या बोलण्यात आलं! असो.
आनंद पाळंदे सरांनी पुस्तकात
लिहिले आहे की, “उत्तरेला निमगिरीचा जुळादुर्ग (११०८ मी) ३०० मीटर उठावला आहे.
डावीकडचा हनुमंत आणि उजवीकडचा निमगिरी यांमध्ये खिंड आहे”!
खिंडयुक्त निमगिरी पाहण्याच्या
उत्सुकतेने ट्रेकला सुरुवात केली. शेतात्तून काही अंतर चालून गेल्यावर एक छोटे
पठार लागले. इथून आता घनदाट जंगल सुरु होणार होते.
पठारावरून हनुमंतगड आणि निमगिरी हो
जोडगोळी पर्जन्य ऋतुमुळे मोहक दिसत होती. सर्वत्र “हिरव्या हिरव्या रंगाची झाडी
घनदाट” दिसत होती. पर्वत जोडगोळी कधी धुक्यात लुप्त होत होती तर धुक्याचे झाकोळे
दूर होताच आपले लख्ख रांगडे सौदर्य परावर्तित करत होती!
“अंकुश लांडे” नावाचा सातवीत
शिकणारा मुलगा आमचा ट्रेक गाईड होता. साधीशी चप्पल घालून तो झपाझप गड चढत होता आणि
आम्ही कधी त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होतो तर कधी त्याला थांबायला सांगत होतो!
शेतं पार केल्यानंतरची झाडी अतोनात घनदाट होती! हाताच्या अंतरावर पुढे चालणारी व्यक्ती दिसणार नाही इतकी घनदाट नागमोडी वळणाची ही जंगलवाट! कंबरेत पूर्ण वाकून पार करावी लागत होती हे सांगायला नकोचं!
शेतं पार केल्यानंतरची झाडी अतोनात घनदाट होती! हाताच्या अंतरावर पुढे चालणारी व्यक्ती दिसणार नाही इतकी घनदाट नागमोडी वळणाची ही जंगलवाट! कंबरेत पूर्ण वाकून पार करावी लागत होती हे सांगायला नकोचं!
साधारण १०-१५ मिनिटाची जंगलवाट पार
केली आणि ह्या झाडीत दडलेल्या काळूबाई मातेचं मंदिराचं दर्शन झालं! दगडात
कोरलेल्या सुबक मूर्तिकामाने थबकायला झालं! देवीचे दर्शन घेऊन ट्रेक पुढे चालू
ठेवला!
आता थोडा चढ होता आणि एकावेळी एकचं
जण जाऊ शकेल इतकी छोटी पायवाट. काहीठिकाणी पायवाट गवताने झाकली गेल्याने अस्पष्ट
झाली होती. हा भाग डोंगराचा दगडी भाग होता त्यामुळे पायवाटेवर सुटे, हलणारे छोटे
छोटे दगड होते. त्यामुळे चालताना थोडी काळजी घ्यावी लागत होती. डोंगरावर गावकरी
आपल्या शेळ्या-गायी चरायला घेऊन आले होते. डोक्यावर गोणपाटाचे इरले, हातात काठी
घेऊन शेळ्या-गायांना हाकणारे गावकरी आमच्याकडे कुतुहलाने पाहत होते!
थोडा चढ चढून गेलो आणि काही
गुहेपाशी येऊन ठेपलो. ही गुहा बरीच लांब पसरली होती. एका माणसाच्या उंचीच्या
गुहेने काही काळ पावसापासून आम्हाला आसरा दिला!
आता वारा सोसाट्याचा सुटला होता.
जोराची झुळूक आली की आहे त्या ठिकाणी थांबाव लागत होतं आणि वेग थोडा कमी झाला की
पुन्हा ही पर्वतयात्रा चालू करावी लागत होती. इथे दुर्गाला जायला पायऱ्या आहेत पण
त्या तुटल्याने धोक्याचा इशारा देत असल्याने आम्ही दुर्गाला वळसा घालून जाणारा
मार्ग निवडला!
थोडा चढ चढून गेलो आणि पुन्हा एक
छोटे पठार लागले. इथून दुर्गाला अंतिम टप्प्यात नेणारा दगडी पायऱ्यांचा चढ सुरु
होतं होता!
दगडात बनलेल्या ह्या पायऱ्या दुर्गाच्या कठीणतेची कल्पना देत होत्या. दोन पर्वतांमधे खिंड निर्माण झाली आहे आणि हवेचा दबाव निर्माण झाल्याने इथे १०० ते १४० च्या वेगाने वारे वाहतात. आज वाऱ्याचा वेग तसा कमी होता. नाहीतर आम्हाला सूचना दिल्या होत्या की “वाऱ्याचा वेग खूप असेल तर चालू नका. एकतर खाली बसा नाहीतर आहे त्या जागीचं उभे रहा”.
इथून खालचा नजरा अप्रतिम दिसत होता. माणिकडोह धरणाचा परिसर, कुकडीनदीचे खोरे, सर्वत्र पाण्याने बहरलेली भातखेचरे आणि भातखेचरांनी वेढलेले कौलारू घरांचे गाव! घनदाट जंगलात उभारलेला वॉच टॉवरही इथून ठळक दिसत होता. तो पाहून मात्र वाटले की निमगिरी किल्ला सिंदोळा, हडसर, हाटकेश्वर इ. पर्वतांवर नजर ठेवण्यासाठी तर बांधला नसेल?
दगडात बनलेल्या ह्या पायऱ्या दुर्गाच्या कठीणतेची कल्पना देत होत्या. दोन पर्वतांमधे खिंड निर्माण झाली आहे आणि हवेचा दबाव निर्माण झाल्याने इथे १०० ते १४० च्या वेगाने वारे वाहतात. आज वाऱ्याचा वेग तसा कमी होता. नाहीतर आम्हाला सूचना दिल्या होत्या की “वाऱ्याचा वेग खूप असेल तर चालू नका. एकतर खाली बसा नाहीतर आहे त्या जागीचं उभे रहा”.
इथून खालचा नजरा अप्रतिम दिसत होता. माणिकडोह धरणाचा परिसर, कुकडीनदीचे खोरे, सर्वत्र पाण्याने बहरलेली भातखेचरे आणि भातखेचरांनी वेढलेले कौलारू घरांचे गाव! घनदाट जंगलात उभारलेला वॉच टॉवरही इथून ठळक दिसत होता. तो पाहून मात्र वाटले की निमगिरी किल्ला सिंदोळा, हडसर, हाटकेश्वर इ. पर्वतांवर नजर ठेवण्यासाठी तर बांधला नसेल?
१५-२० पायऱ्या चढून गेल्यावर
निमगिरी दुर्गाचे पठार आले.. पठार काय पोपटी रंगाच्या लुसलुशीत गवताळ कुरणाचा
गालिचाच जणू! आपल्याकडे
खेचून घेणारे वॉटर सिस्टर्ण आणि काही भग्न अवशेष! म्हणजे हा किल्ला निसर्गाचं मुक्तहस्त देणं आहे! दुरून
दिसणारे सिंदोळा, हडसर किल्ले, माणिकडोह धरणाचा परिसर आणि कुकडी नदीचे खोरे!
निसर्गाचे हे सुंदर रूप फोटोतून दाखवणारे अभिजित काही खासचं!
निसर्गाचे हे सुंदर रूप फोटोतून दाखवणारे अभिजित काही खासचं!
“डोंगरयात्रा” पुस्तकात लिहिले आहे, “पाण्याच्या प्राचीन कुंडाजवळून आणि झाडीतील देवळाजवळून
पुढे घळीतून चढत निमगिरी माथा गाठावा (१ तास). माथ्यावर पाण्याची टाकी आणि पूर्व कड्यावर
गुहा आहे”.
पठारावर दुपारचे भोजन करून, गडफेरी
करून तास-दीड तासाने आम्ही परतीचा ट्रेक सुरु केला.
उतरताना जरा जास्तचं काळजी
घ्यावी लागत होती कारण सुटे दगड, पाण्याचे वाहणारे ओहोळ, चालताना मधे मधे आडवे
येणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि पावसामुळे झालेले निसरडे!
FYOWS टीम, डावीकडून: निखील बोधाले, शांतनू आणि तृष्णा आगळे सोबत |
पावसाळ्यातील हा ट्रेक मला विशेष
आवडला. एकतर चढायला म्ह्टलं तर सोपा म्हटलं तर थोडासा अवघड, कमी उंचीचा, चढायला
आणि उतरायला वेळ कमी घेणारा, कमी थकवा देणारा, प्रचंड वाऱ्याच्या तावडीतून स्वत:ला
सावरण्याच्या धडपडीतील आनंद देणारा आणि निसर्ग सौदर्याने भरभरून नटलेला!
पावसाळ्यात भिजण्याचा आणि वर्षाविहाराचा आनंद ह्या ट्रेक ने दिला!
आनंदाचे दुसरे एक कारण होते ट्रेक
सहकारी! जाताना सुंदरशी गाणी गाडीत वाजत होती. त्या गाण्यांवर ट्रेक सहकाऱ्यांचा
डान्स सुरु झाला. स्वप्नील, बिपलव आणि तृष्णा यांनी एकसे एक अदाकारी करून आम्हाला
मंत्रमुग्ध करून टाकले!
दुर्ग पठारावर या सहकाऱ्यांनी
निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला!
ट्रेक परतीत गाडीत अंताक्षरी
रंगली... नाही दोन गटात ती पेटली होती!
किती तो जोश, उत्साह, दंगा, कल्ला, मस्ती, मिस्कीलता, भन्नाट कमेंट्स,
जोक्स, सॉलीड सेन्स ऑफ ह्यूमर....एकदम झिंगाट!
बिपलव प्रोफेशनल डान्सर...
स्वप्नील ने त्याला तोडीची साथ दिली! स्वप्नीलने अशी जबरी छाप सोडली की तो आठवला तरीही ट्रेकचा आनंद मिळेल!
स्वप्नील ने त्याला तोडीची साथ दिली! स्वप्नीलने अशी जबरी छाप सोडली की तो आठवला तरीही ट्रेकचा आनंद मिळेल!
प्रदीप ने मला जन्मदिनाच्या
शुभेच्छा दिल्या. अंत:करणापासूनच्या त्याच्या भावना मला नेहमीच कृतार्थ करत
राहतील!
मयुरेश जगताप हा असाचं एक कलंदर!
माझ्या ब्लॉग मधे त्याचा फोटो त्याला हवा होता. मिस्कीलपणे म्हणाला, “मॅडम, लिहा की हा माझ्याबरोबर ईबीसी ट्रेक
ला येता येता राहिला”...हे आठवले की उषा आणि माझ्या चेहऱ्यावर आजही हास्य
पसरेल!
स्मिता आणि फोटो सेशन्स हे समीकरण
न तुटणारे आहे! स्वत:चे फोटो काढून घेण्यात आणि ते परत मिळवण्यात तिच्या इतका
हातखंडा कोणाचा नाही!
उषाची फोटोग्राफी यावेळी कमाल होती.
निमगिरी एक “ऑफ बीट” ट्रेक आणि
सोबतीला हे “हटके” ट्रेक मेट्स! निमगिरी “ऐतिहासिक” झाला असचं म्हणावं लागेल”!
पुणे जवळ येत होते आणि माझं मनं मात्र ह्या जोडगोळी वरचं खिळून होतं! राहून राहून निमगिरी शेजारचा “हनुमंतगड” लक्ष वेधून घेत होता आणि मनाला अस्वस्थ करत होता. ह्या जुळ्यादुर्गाची माहिती का उपलब्ध नाही? तो दुर्ग टेक्निकल आहे म्हणजे नक्की काय? कोणी त्या दुर्गाची पर्वतयात्रा केली आहे का? केली नाही तर का नाही? गावकरी पण त्या बाजूला दिसत नव्हते असं का? ट्रेकर्स नी हनुमंतगडा पेंक्षा निमगिरीला महत्व का दिल आहे?....
६ जुलै ला अगदी अनपेक्षितपणे श्री. आनंद पाळंदे सरांची भेट आणि ओळख झाली. त्यांना मी हा ब्लॉग दाखवला. मला म्हणाले," मी तुमचे आधीचे ब्लॉग वाचलेत. तुम्ही खूप प्रामाणिकपणाने लिहिता"! त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी मन भरून पावले!
डावीकडून: उष:प्रभा पागे मॅडम, आनंद पाळंदे सर, उमेश झिरपे सर |
फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, स्वप्नील शिंदे आणि ट्रेक टीम
No comments:
Post a Comment