रामायणातील कथाशिल्पांनी सुशोभित सरडेश्वर मंदिर, पळसदेव


शिवमंदिर अर्थात पळसनाथ मंदिर. गाव. पळसदेव. ता. इंदापूर, जि. पुणे. येथील भीमा नदीकाठी बांधलेल्या उजनी जलाशयातील हे मंदिर.



मंदिराच्या मागील बाजूस एक शिल्प आहे. शंकर आपने वाहन नंदी वर आरूढ आहेत तर सोबतची गौरी अर्थात पार्वती सरड्यावर. म्हणूनच या स्थळा "सरडेश्वर" म्हणूनही ओळखले जाते. 




पौराणिक कथेनुसार त्याची आख्यायिका आहे ती पुढीलप्रमाणे,

नहुष राजा हा पुरुरवा चा मुलगा. वृत्रासुर च्या वधाने इंद्र जेव्हा ब्रह्महत्या चे प्रायश्चित्त म्हणून एक हजार वर्ष तप करण्यासाठी गेला तेव्हा नहुष याला स्वर्गाचा राजा बनवले गेले. त्याचा त्याला उन्माद चढला. त्याने कां नजरेने इंद्राणी देवी कडे पाहिले. अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा इंद्राणीने त्याला शाप दिला की तू सरडा बनशील आणि पृथ्वीवर जाशील. नहुष राजा सरड्याच्या रुपात पळसदेव मंदिर समूहाच्या आवारात पडला म्हणून त्याला "सरडेश्वर" म्हणतात.

गुगुल वर माहिती शोधताना एका लेखात मला "सरडेश्वर" असा उल्लेख सापडला (संदर्भ नं २)



पळसदेव मंदिराशेजारील देवालयात खालील शिलालेख आहे. स्थानिक लोकं हे मंदिर बळीराजाचे आहे असे मानतात.



शिलालेखाच्या वाचनात याचा उल्लेख "सरडेश्वर" असा केला आहे (संदर्भ नं ३)


पळसनाथ मंदिराच्या समोर घाटावर थोड्या उंच टेकडीवर एक मंदिर आहे. पळसदेव येथील पाच मंदिर समूहापैकी हे एक मंदिर. ही मंदिरे पंचायतन आहेत असे तज्ञ मानतात.



पळसनाथ, बळीराजा, काशिनाथ, विश्वनाथ आणि सोमनाथ अशी ही पाच मंदिरे स्थानिक लोकांच्या सांगण्यातून. त्यातील काशिनाथ मंदिराचा गाभारा रिता आहे. विविध लेखांमध्ये या मंदिराचा उल्लेख काशिनाथ, सोमनाथ, सूर्यदेव मंदिर, विष्णू मंदिर, राम अथवा रामनाथ मंदिर, वैष्णव मंदिर , सरडेश्वर असा केलेला आहे. आपण "सरडेश्वर " मंदिर म्हणून चालुयात.




याचं सरडेश्वर मंदिराबद्दल या ब्लॉगमधून जाणून घेऊयात.

गर्भगृह , त्या पुढील अंतराळ अ सभामंडपासाठी असेलेले दोन प्रवेश व मुखमंडप अशी त्याची रचना आहे. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे गर्भगृहाचे साधे प्रवेशद्वार. हे मंदिर तेराव्या शतकाच्या प्रारंभी बांधले असावे (संदर्भ नं २ नुसार)




मंदिराचा अंतराळ, देवकोष्ठ आणि रंगशीळा अत्यंत सुबक कोरीव आहे.  





मंदिराचा काही भाग ढासळलेला परंतु शिल्प वैभव मात्र सुस्थितीत आहे. मंदिराच्या बाह्यभागावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. त्यातील काही कथाशिल्पे इथे देत आहे.

रावणशिल्प




सीताहरण




हनुमानाने अशोक वाटिकेत केलेला उत्पात



सेतुनिर्मिती






धनुर्धारी राम आणि लक्ष्मण




देवकोष्ठ स्थित विष्णू




सूरसुंदरी




मंदिराचा डोलारा




सरडेश्वर  मंदिर आणि बाजूला दिसणारे पळसनाथ मंदिर ह्याचे सौदर्य तर काय मनोहर




मंदिरातील हे विलोभनीय शिल्पवैभव पाहून मी स्तिमित झाले. एक एक शिल्प ओळखण्यासाठी अभ्यासही तितकाच दांडगा हवा. 

पळसदेव मंदिर समुहाची माहिती शोधत असताना दोन उत्कृष्ट लेख वाचण्यात आले. ते इथे देत आहे.




पळसदेव मंदिर समुहावर केलेल्या अभ्यासावर आधारित हा लेख डेक्कन कॉलेज च्या बुलेटीन मधे प्रसिध्द झाला आहे (संदर्भ नं १). या लेखाची लिंक खाली देत आहे.




दुसरा लेख (संदर्भ नं २)




लेखाची लिंक खाली देत आहे,

www.evivek.com/Encyc/2016/6/25/1850923

गुगलवर शोधताना सरडेश्वर किंवा पळसदेव मंदिर समूहा वर दिलेल्या पौराणिक कथा किंवा आख्यायिकेशी साधर्म्य असणारे प्रतापगढ़ (उ. प्रदेश) येथील "अजगरा" शहराविषयी वाचण्यात आले. (खालील माहिती आणि फोटो गुगल वरून घेण्यात आले आहेत)



दोन प्रदेशातील आख्यायिकेशी असणारे साधर्म्य वाचून मी देखील किंचित अचंबित झाले. छान वाटले. "सरडेश्वर" आणि "अजगरा" यांच्या कथेतील साम्य वाचून.





असो.

काशिनाथ/रामनाथ मंदिरामधील एकीकडे अति विलोभनीय शिल्प वैभव पाहताना मंदिराची ढासळलेली स्थिती पाहून मन खिन्न झाले. कोणत्या टप्प्यावर काय करता येईल जेणेकरून हा बहुमुल्य वारसा सुस्थितीत जतन होईल हे विचार डोक्यात सुरु झाले......



हे विचार सुरु ठेवतच पळसदेव गाव सोडल......

उजनी धरणाची पाण्याची पातळी ओसरल्याने हा मंदिर समूह पाहता आला. सरडेश्वर मंदिराच्या शिल्पवैभवाची माझ्या परीने नोंद ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!

आशा करते तुम्हाला भावेल.............

धन्यवाद!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

मुख्य संदर्भ: 

१. पळसदेव येथील मंदिर समूह एक अभ्यास: लेखक: बी.एस. गाजूल, प्रमोद दंडवते, पी. डी. साबळे. 

Bulletin of the Deccan College Post Graduate and Research Institute, Vol 72/73 (2012-2013), pp 337-346.
Published by: Vice Chancellor, Deccan College Post Graduate and Research Institute (Deemed University), Pune

२. गंगार्पण पळसदेवाचे: लेखक: अरुणचंद्र शं. पाठक, विविक मराठी, २५ जून २०१६ आणि महाराष्ट्रा टाईम्स १० जुलै २०१६

३. महाराष्ट्र आणि गोवे ताम्रपट आणि शिलालेख : लेखक: शांं. भा. देव


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺


ही मंदिर वारसा सहल आयोजित केल्याबद्दल खास आभार: फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

हे मंदिर इतके भावले की माझी बहीण आणि जिजाजी यांनाही ते पाहण्याची उत्सुकता दाटली...







3 comments:

Pr@Gun said...

Loved this picture tour, so much about this unique place.

Unknown said...

रंगशीळा म्हणजे नेमका कोणता भाग

Unknown said...

ऐतिहासिक विविध कलाकृतीने व शिल्पकलेने नटलेले पुरातत्ववादी असे हे माझे सुंदर गाव