लेकर हम दिवाना दिल
फिरते हैं मंझिल मंझिल
कही तो प्यारे किसी किनारे
मिल जाऊं तुम अंधरे उजाले......
मजरुह सुल्तानपूरी यांनी लिहिलेल, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल\ "यादों की बारात" सिनेमातील हे गीत! या गाण्यातील, "लेकर हम दीवाना दिल..." या ओळींचा अर्थ सांगणारा हा प्रवास , हा ब्लॉग!
हा सुरेल प्रवास सुरु झाला तो १ डिसेंबर २०२३ पासून. जेव्हा संगीत सफरचं हे पोस्टर माझ्याकडे आलं.
पोस्टर बघत होते तोच पाठोपाठ जितेंद्र चा फोन. त्याचा पहिला स्टेज performance! वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात! पुणे ते वाशी प्रवासाचा विचार नंतर आला. निर्णय त्याआधीच केला होता. मी जायचं ठरवलं होतं.
जितेंद्र हा माझा वर्गमित्र! आम्ही दहावी इयत्तेपर्यंत ऐकाच शाळेत शिकलो. १९८३ ची आमची बॅॅच! दहावी नंतर सगळे इकडे तिकडे विखुरले गेले. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी भेटलो. जवळजवळ ३८ वर्षांनी ! " कभी अलविदा ना कहना" ! ह्या एका वचनावर!
"कभी अलविदा ना कहना " अर्थात पूर्णविराम कुठेही नाही. प्रवास अखंडित चालूच.....
जितेंद्रच्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं ठरवल्यावर मन /हृदय एकदम " दिवाना" स्थितीत! म्हणजे काय? पुढे वाचत जा...अर्थ समजत जाईल.!
जितेंद्र, अविनाश, स्मिता आणि मीरा. यांच्यासोबत फोनाफोनी झाली. वाशीला जायचं कसं ह्याचा रिसर्च झाला. अविनाश जवळ तिकीट आले. अविनाश ने प्रोग्राम ठरवला.
दुपारी २.१५ च्या शिवनेरी ने हम ये दिवाना दिल लेकर वाशी कि तरफ निकल पडे| फ्रेंड्स ना भेटण्यासाठी एक उत्सूक दिल! २८ नोव्हेंबर २०२१ दिवसाच्या आठवणीत रमलेल "दिल"!
प्रवासात छान डुलकी झाली. रिफ्रेश झाले. स्मिता आणि अविनाश सोबत संपर्कात राहून ५ वाजता नेरूळ ला उतरले. हे दोघेही चकित. वेळेच्या खूप आधीच पोहोचले.
अविनाश, मी आणि स्मिता त्याच्या घरी गेलो. त्या दोघांना पाहून " दिवाना दिल खुश हो गया"! पुर्नभेटीच्या आनंदात तुडुंब भिजलेल !
अविनाशच्या कुटुंबियांना भेटून नातेसंबंधाची कडी एकमेकाशी जोडली गेली.
संजय, नारायण आणि सुनील यांच्या सोबत मिसेस अविनाश यांनी केलेला जेवणाचा खासम खास बेत. गुळाची जिलेबी आणि मासवडी! ते पाहून "दिवाना दिलाने आत्मसंतुष्टी अनुभवलेली! पारंपारिक लज्जतदार, चविष्ट, खाद्यपदार्थ ची चव चाखून "दिल दिवाना हो गया"! त्या मासवडीची चव कायम जिभेवर राहिल.
गाण्याच्या कार्यक्रमाची वेळ ८.३० ची. थोडी वेळेची घाई झाली. पण मज्जा आली. अविनाश ने हे सर्व घडवून आणलं आणि २०२१ नंतर किंचित थंड पडलेली संवाद साखळीला सोन्याची झळाळी आली!
खरंतर पृथ्वी थिएटर पाहण्याची प्रबळ इच्छा. पण "दिवाना दिल" पहिलं आलं ते विष्णुदास भावे नाट्यगृहात!
हे सर्व अनुभवत असताना "दिवाना दिल" म्हणे " यावर ब्लॉग तर हवाच! म्हणून हा सारा प्रपंच!
नाटकाची अरे नाही, संगीत सफर ची तिसरी घंटा झाली! पडदा सरकला आणि समोर आला जितेंद्र! ह्या गाण्याच्या मैफिलीच ओपेनिंग जिंतेंद्र च्या गाण्याने आणि ते गाणं होतं " दिवाना लेके आया है दिलका तराना..."! जितेंद्र चा सोलो performance !
माझा "दिवाना दिल" मात्र गाणं ऐकत होतं, रेकॉर्ड करतं होतं, ओठ गाणं गुणगुणत होतंआणि त्याचवेळी काही काळ मागे गेलं होत.
साधारण २०२१ वर्षाच्या शेवटी शेवटी जितेंद्र ने आपली गाण्याची आवड मूर्त रुपात पुढे आणण्यासाठी सुरुवात केली. आमच्या २८ नोव्हेंबरच्या गेट-टुगेदर मधे त्याने गाणी गाऊन धमाल आणली. त्यानंतर त्याच्या गाण्याच्या रिहर्सल्स सुरु राहिल्या. आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून. त्या रिहर्सल्स चे रेकॉर्डिंग आम्हाला आनंद देत होते. कधी गाडीत, कधी अवसरीला, कधी त्याच्या मुंबईच्या घरी रिहर्सल्स सुरु होत्या. त्या गाण्यावर आम्हा प्रत्येकाचा अभिप्राय होताच. दोन वर्षाचा हा कालावधी. जितेंद्रची गायनाची कला आणि प्रयास आज त्याला ह्या स्टेज वर घेऊन आलेले! त्याला स्टेज वर गाताना पाहताना हे सर्व डोळ्यासमोर आले. "दिवाना दिल" इतका भावूक झाला की त्या भावना व्यक्त करण्यासाठी लिखित शब्दांचा आधार घ्यावा लागला. इयत्ता दहावीत असताना पुसटसा आठवणारा आमचा मित्र, एकदम ३८ वर्षांनी भेटतो काय आणि पुढच्या दोन वर्षातच तो गाण्याच्या ह्या टप्प्यावर येतो काय. किती सुंदर आहे हा प्रवास!
हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे, देख के तुमको दिल डोला है आणि अर्थात लेकर हम दिवाना दिल....एक सोलो, दोन duet आणि एक ग्रुप song ...जितेंद्र ला ऐकताना मन तुप्त झाल, त्याची गायकी, आत्मविश्वास, देहबोली, शब्द फेक, comfortless, स्टेज वरचा सहज वावर खूप सगळचं लाजवाब!
पुण्यावरून वाशीला आलेला माझा "दिवाना दिल" ह्याची तर अनुभूती घेण्यासाठी आसुसला होता! रात्री १२ वाजेपर्यंत हे आनंदी गायीकीचे घोट पीत होतो तरी तहान भागलेली नव्हतीच......
जितेंद्र सोबत इतरही गायकांची गाणी कमाल होती! निवेदन सुद्धा अतिशय सुंदर!
९ ते १२ हा वेळ संगीत सफर मध्ये असा काही रमला की बस्स! वाद्यवृंद तर एकदम भन्नाट! एकसे एक वाजवत होते. त्यांच्या वादनाने गायकांची गायकी अधिकच बहरून आली.
ह्या सर्वांची गायकी ऐकताना प्रेक्षक म्हणून आम्हीच कमी पडलो कि काय असे वाटले.
१२ जानेवारीची रात्र स्मिताकडे राहिले. रात्री १२ नंतर मुंबई कशी दिसते ह्याचे डोळासुख छानच! स्मिताच्या मुलाला आणि मुलीला भेटून हा "दिवाना दिल" blessed होता. ईश्वराचे आभार त्याने अशा एका वळणावर आमची पुर्नभेट घडवली जिथे एकमेकांबद्दल फक्त आणि फक्त कृतार्थता आहे!
१३ जानेवारीची सकाळ आमच्या लहानग्या हितार्थी च्या निरागस हास्याने उजाडला.
मीराच्या येण्याने आनंद द्विगुणीत झाला. मग काय गप्पा, नाश्ता, सुग्रास जेवण आणि मनभर फोटोग्राफी!
जितेंद्र चे गाणे हा आमच्या गप्पांचा गाभा! पुण्यात त्याच्या गाण्याचा कार्यक्रम व्हावा हीच आता इच्छा!
घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. "दिवाना दिल" म्हणत होता " चलं पुने कि ओर निकल जाये"! प्रगती एक्प्रेस मध्ये ह्याच घड्याळाचे काटे मागे जात होते. दोन दिवसांच्या सुरेल चित्रपटात रमत होते. किती सुंदर होते ते दोन दिवस! नातेसंबंधाचे, संवादाचे, भावनांचे, गप्पांचे, आनंदाचे, सुरेल गान मैफिलीचे, जिभेवर रेंगाळणाऱ्या चविष्टभोजनाचे आणि सुरेख आठवणींचे!
पुण्यात आलेय पण मन अजूनही तिथेच रेंगाळतयं! तिथेच गुंतलयं! सारखं सारखं जितेंद्र च्या गाण्याचे रेकॉर्डिंग ऐकतयं! फोटो पाहतय!.....मुठी एवढं दिल पण किती जागा आहे त्यात हे सर्व सामावून घेण्यासाठी!
मित्रांनो, समजला ना " लेकर हम दिवाना दिल" चा अर्थ! दिल दिवाना अर्थात आसुसलेला होता, जितेंद्र चा स्टेज performance पाहण्यासाठी, मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत होणाऱ्या संवादासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, चविष्ट खाण्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवलेले क्षण फोटोत टिपण्यासाठी!
तर अशी ही जितेंद्र च्या गाण्याची संगीत सफर आणि माझी पुणे ते वाशी प्रवास सफर!
आवडली ना???
पुन्हा भेटूच!
लेकर हम दिवाना दिल.....फिर आयेंगे! फिर मिलेंगे!