पोखरची विस्मयकारक लेणी

पोखर, सासवड जवळील नारायणपूर पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेले हे गाव! गावात पोहोचलो तसे गावातील शाळेसमोरच्या एका छोट्या डोंगरावर ही लेणी वसली आहेत असे सांगण्यात आले. शाळेसमोरील रस्त्याने डोंगराकडे वाटचाल सुरु केली.  दूरवरून पाहताना इथे लेणी आहेत अशी कल्पना सुद्धा आली नाही.डोंगर चढायला अगदी सोपा.. ५-१० मिनिटात  आम्ही चढून लेण्यांजवळ आलो.
छोट्याशा डोंगरात पोखरलेली ही लेणी. दुमजली.
खालच्या गुहेचे दोन भाग. आतला भाग गाभाऱ्या सारखा.तिथेच दृष्टीस पडली ही मूर्ती! कोणीतरी कोरण्याचा प्रयत्न केला पण काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाही.


शेंदूर अर्चित आणि मूर्तीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तिची ओळख पटणे  खरोखरच कठीण. फक्त कयास बांधला जाऊ शकतो.


मूर्ती कडे निरखून पाहिल्यास तीन मुख असणारी मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे लक्षात येते.
घारापुरी येथील त्रिमूर्ती शिवरूप स्वरूप कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.

श्री. क्षेत्र नारायणपूर जवळच असल्याने ही मूर्ती दत्तात्रेयाची सुध्दा असू शकते असा विचार मनात येतो.

ह्या मूर्तीकडे तोंड केल्यास गाभाऱ्यातच उजवीकडे आणि डावीकडे काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. त्या नक्की काय आहेत ह्याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

उजवीकडील मूर्तीडावीकडील मूर्ती


ह्या मूर्ती रचना पाहता त्या आठव्या ते नवव्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे.

वरच्या भागात चढायला किंचित कसरत करावी लागते. वरच्या भागात काही कोरीव कारागिरी नाही. शेंदूर अर्चित काही दगडी प्रतिमा आहेत.
लेणीस्थित डोंगरावरून पुरंदर आणि वज्रगडाचे दर्शन होते.

ह्या लेण्याचा मागोवा घेतल्यास काही माहिती मिळू शकते का हे पाहणे महत्वाचे आहे.

लेणी मात्र अचंबित करणारी आहेत. कोणी बांधली, का बांधली, कशाची मूर्ती कोरण्याचा हेतू होता, का अपूर्ण राहिला..इ. प्रश्न लेणी पाहल्यावर समोर येतात.

ह्या प्रश्नांना मनात घोळवतच डोंगर उतरलो.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

दि. ७ जुलै २०१९ रोजी पुण्यातील "फिरस्ती महाराष्ट्राची" तर्फे या लेणीला भेट देता आली.

संदर्भ: पुस्तक "फिरस्ती महाराष्ट्राची": लेखक: शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य


गुरुपौर्णिमेला भाविकांसाठी खुले होणारे श्री. त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर


दि. १६ जुलै २९१९. आज गुरुपौर्णिमा. पुण्यात सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर आणि समाधी आज सकाळपासून भाविकांसाठी खुले झाले.......


पुण्यात, सोमवार पेठेतील हे एक पाषाणशिल्पी प्राचीन मंदिर. 


गर्भगृहातील काळ्या पाषाणातील मोरावर आरूढ गणेश मूर्ती, एक मुख, तीन सोंडा, सहा हात असलेली आहे.मंदिराला तळघर असून जिवंत पाण्याचा झरा तिथे आहे. श्री. गुरुदत्ताचे भक्त गोसावी यांची समाधी तळघरात आहे. हे तळघर फक्त व्यास अर्थात गुरुपौर्णिमेला भाविकांना दर्शनासाठी खुले असते.

ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळील धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी यांनी १७५४ 

ते १७५७ या काळात मंदिराची उभारणी केली.

गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर लिंगोद्धव शिव शिल्प आणि नटराजाची सुरेख मूर्ती आहे.

द्वारपाल, भारवाहक यक्ष, एकशिंगी गेंडा, गजलक्ष्मी, गणेशयंत्र, शेषशायी विष्णू इ. अप्रतिम कलाकुसर असलेली कोरीव शिल्पे मंदिराच्या दर्शनी भागात, अंतराळ आणि गर्भगृहात आहेत. 

एकशिंगी गेंडा शिल्पलिंगोद्धव शिव शिल्प

नटराज प्रतिमागर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन संस्कृत मधील तर एक फारसी भाषेतील शिलालेख आहे. 

तळघरात जायला पायऱ्या आहेत. गुडघाभर पाण्याने तळघर भरलेले असते.

गुरुपौर्णिमा निमित्ताने सकाळी देवदर्शन सोबतच तळघर आणि समाधी दर्शन घेतले. त्याची हे काही छायाचित्रे........

मंदिराची माहिती
तळघरातील दत्तभक्त गुरु गोसावी यांची समाधी


तळघराला जाणाऱ्या पायऱ्या

तळघरातील पाण्याचा जिवंत झरा


गुडघ्याएवढे पाणी

तळघरातील भिंतीतील कोनाडे

समाधीमार्गध्यानाचे स्थान
समाधीस्थळ


गर्भगृहातील गणपती ची मूर्तीगुरुपौर्णिमा निमित्त केलेले सुरेख सजावट आणि रोषणाई

😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

सासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर


श्री. क्षेत्र नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर मंदिराचा प्रथम दर्शनी भाग
मंदिराचा प्रवेशदर्शनी भागनंदिशिल्पगाभाऱ्यातील प्रवेशद्वारावरील सुरेख द्वारपाल शिल्पगाभाऱ्यातील नारायणेश्वर..


अंतराळसमोरील कमानीतून दृष्टीस पडणारे मंदिरचांगावटेश्वर देवस्थान


कथा सांगणारा मंदिराबाहेरील फलकमंदिराचा प्रवेशभाग

मंदिराचा बाह्य भाग


सभामंडपातील नंदिशिल्प


गाभारा..


मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील नक्षीकाम


मंदिराच्या आवारातील दीपमाळ


मंदिराचा बाह्यदर्शनी भागकऱ्हा आणि चांबळी नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्वर मंदिर

प्रथम दर्शनी भाग


मंदिराचे  प्रवेशद्वारसभामंडपातील नंदिशिल्पअंतराळ

सभामंडपातील शेंदूर अर्चित हनुमान आणि गणेश प्रतिमा..
पुलावरून दिसणारे मंदिराचे विलोभनीय दृश्य


सासवडचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर


मंदिराचा सभामंडप


अंतराळ

गाभारा


मंदिराच्या आवारातील काही देव-देवतांच्या प्रतिमा


गाभाऱ्याकडून प्रवेशद्वार


मंदिराचे वैशीष्ट्य..वसईच्या तहातील पोर्तुगीज घंटा.


घंटेवर शिलालेख आहे.


पेशवे बाळाजी विश्वनाथ भट समाधीस्थळ


सरदार पुरंदरे वाडा

मुख्य प्रवेशद्वार: सरदार पुरंदरे हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या घनिष्ठ संबंधी होते. ह्या वाड्याच्या रचनेच्या संकल्पनेवर आधारित पुण्यातील शनिवारवाडा बांधला असे म्हटले जाते.वाड्याची कडा भिंत


फिरस्ती टीम


पोखरची लेणी

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

दिनांक ७ जुलै २०१९ रोजी ही वारसा सहल आयोजित केल्याबद्दल खास आभार

फिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails, पुणे

फोटो आभार: टीम सभासद