साल नक्की आठवत नाही.. ९४-९५ असावे...भुलेश्वर मंदिराला भेट दिली होती. डोळ्यासमोर आजही मंदिराचे ठिकाण ताजे आहे.नजर जाईल तिथपर्यंत शेते. माणसांची वस्ती नाहीच.....शेतामध्ये एक टेकडी आणि टेकडीवर मंदिर. काहीसं एकांतात वसलेलं. किंचित भीतीदायक. दूरदूर वाहन दिसत नव्हत. आम्ही कुठून गेलो आठवत नाही पण जवळजवळ कित्येक किमी चालत जाऊन ट्रेकच केला होता. मंदिराच्या आजूबाजूला चीटपाखरू देखील नव्हत. मंदिरातील शिल्पकलांशी नजरभेट झाली. हो, नजरभेटच ती. ना मंदिराचा इतिहास माहित, ना शिल्पकलांचे ज्ञान. शिल्पांची नावे तर सोडूनच द्या.......नेत्रसुख एवढच काय ते.......
तो शांत परिसर! मंदिरांचे शिल्पवैभव! नेत्रसुखातील एक जादू !
कदाचित तीच जादू आजही तिथे खेचत नेते. आजचा मंदिर परिसर माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेला असला तरीही!
पुणे जिल्यातील दौड तालुक्यातील यवत जवळील भुलेश्वर! भुरळ पडणारे! मंत्रमुग्ध करणारे!
शिल्पकारांच्या सिद्धहस्त जादूतून पुढे आलेला एक अमोल नजराणा!
असंख्य शिल्पे, रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांचे जादुई शिल्पविश्व!
"फिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails " तर्फे ७ जुलै २०१९ ला पुन्हा एकदा मंदिराची नजरभेट झाली. नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेट मधे कसे झाले ह्याचा हा प्रवास!
मंदिराच्या काही अंतरावर एक ढासळलेल्या बुरुजावरून घेतलेले मंदिराचे हे सुरेख छायाचित्र!
भुलेश्वर मंदिर आणि परिसर हा खरंतर दौलतमंगळ नावाचा किल्ला होता. किल्ल्याचे काही भग्न अवशेष जसे बुरुज, प्रवेशद्वार अशा काही खुणा आजही किल्ल्याची साक्ष आहेत....
किल्ल्याचे हेच ते प्रवेशद्वार...
अजून काही पायऱ्या चढल्यावर दिसला तो मंदिराचा सुंदर परिसर..
मंदिराच्या प्रांगणाच्या आरंभाला स्वागत करतात ते द्वारपाल..
आणि ह्स्तीशिल्प...........
मंदिराच्या प्रांगणात एकीकडे आहे चतुष्की. हीचा उपयोग यज्ञ किंवा दीक्षा देण्यासाठी होत असावा.
तर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे ही भलीमोठी घंटा...
हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार...अतिशय साधे ...वाकून जावे इतके छोटे....
मंदिराच्या छतावर आहे हे सुंदर नक्षीकाम...
दरवाज्याकडे तोंड करून आहे हे कासवाची प्रतिमा...कासवासारख्या धीम्या शारीरिक आणि मानसिक गतीने मंदिरात प्रवेश करावा असेच जणू सांगण्यासाठी .
दरवाजाच्या पायरीजवळ आहे चतु:शीला...त्यावर दोन्ही बाजूला कोरले आहेत दोन कीर्तिमुख...
किंचित झुकत दरवाज्यातून आत गेल्यावर लागते दोन्ही बाजूला सुरेख नक्षी असलेले किंचित बसके अजून एक द्वार......ह्या द्वारावर पाच पट्ट्या कोरलेल्या आहेत...
डावीकडून त्यांची नावे आहेत, व्यालशाखा, पत्रशाखा, स्तंभशाखा, नर अथवा मानवशाखा आणि पुन्हा पत्रशाखा...
आणि द्वारावर आहे ललाटबिंब...
दरवाज्यातून समोरच दर्शन देते ती हनुमान प्रतिमा...
उजवीकडून काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दिसते ते चकित करणारे मंदिराच्या सभामंडपातील शिल्पवैभव! हो वैभवच ते...नक्षीदार असंख्य स्तंभांनी आणि शिल्पांनी नटलेले आणि मढलेले सभामंडप........
हे शिल्पवैभव मोहून टाकणे, मतीगुंग करणारे ....ह्या मोहजलातून बाहेर आले हे भुलेश्वर अर्थात शिवाचे दर्शन घेण्यासाठी.....
दर्शन घेऊन निघताना नजर खिळवून राहिली ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे!
सूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित वळवले ! कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण? किती ही उदात्त भावना....
.
सभामंडपात एका विलक्षण प्रतिमेने लक्ष वेधून घेतले....भव्य कासव प्रतिमा...
हे कासव इथे कसे आले? की आधीच इथे होते? ह्या पेक्षाही मला भावले तो त्याची मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव?
आता सुरु झाला नजरभेट ते ज्ञानभेट हा प्रवास.....एक एक शिल्प बारकाईने पाहून त्यामागची त्याची कथा भावार्थ समजून-उमजून घेण्याचा प्रवास...
रामायणातील श्रीराम-भरत मिलाप दृश्य साकारणारे हे सुरेख शिल्प...
श्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)
हत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...
रामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे..
महाभारतातील युध्दासहित काही प्रसंग इथे कोरलेले आहेत. त्यापैकी एक द्रौपदीस्वयंवराचा शिल्पपट असाच मनमोहक..
रथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..
पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव....
द्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा
घटोत्कच युद्ध..
सभामंडपात एका ठिकाणी उंचावर समुद्रमंथन प्रसंग शिल्पपट आहे..समुद्रमंथन एक सुप्रसिद्ध पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून हे समुद्रमंथन केले होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वैभव समुद्रात मिळाले. समुद्रात पडलेले वैभव परत मिळवण्यासाठी विष्णूने इंद्राला समुद्रमंथनाचा उपाय सुचवला. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृतप्राप्ती होईल . वैभव पुन्हा प्राप्त होईल. अशी ही थोडक्यात कथा असणारे हे शिल्प!
सभामंडपात अगणित देवकोष्ठ आहेत. मुख्य मंदिराच्या बाह्य भागावर सूरसुंदरीची विविध शिल्प कोरलेली आहेत. मूर्तीभंजकांनी ह्या शिल्पांची तोडफोड केली असली तरी शिल्पकारांनी किती कल्पकतेने शिल्पांमध्ये सौंदर्य भरले आहे ह्याची कल्पना शिल्प पाहताना येते.
हातात मृदुंग घेतलेली ही सुंदरी. हीच नाव आहे मर्दला!
प्रेतावर उभी चामुंडा..सप्तमातृका पैकी एका शैवशक्ती चे एक संहारक, रौद्र रूप. पौराणिक कथे नुसार काली अवतारात असताना या शक्ती देवतेने चंड आणि मुंड या दोन शक्तीशाली असुरी वृत्तीच्या राक्षसांना ठार मारले. त्यामुळे हिला चामुंडा हे नाव मिळाले. या देवतेचे वाहन प्रेत असते. पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरात प्रेतावर उभ्या देवी चामुंडाचे शिल्प आहे. मुर्तिभांजकांनी हात - पाय तोडले असले तरी देवी चामुंडा चे हे अद्भुत शिल्प शिल्पकारांनी इथे कोरले आहे.
महिषासूरमर्दिनी..
मर्कट आणि सुंदरी..
नाग धारण केलेली वनिता..
दर्पणसुंदरी..सौंदर्य आरशात न्याहाळण्या सोबतच शिल्पाचा भावार्थ आहे, मंदिरात जाण्याआधी स्व-अवलोकन, आत्म-मंथन, आत्म-विश्लेषण करा. आपल्या भावना, विचार यांचा मागोवा घेत पवित्र मन सौंदर्याने मंदिरात प्रवेश करा.
सप्तमातृकामधील ऐरावतावर आरूढ इंद्राणी..
सप्तमातृकामधील..डावीकडील विनायकी, बैलावर/वृषभावर आरूढ माहेश्वरी आणि मोरावर आरूढ कौमारी....
सप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या. ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी.एन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा ह्या त्या सप्तमातृका! हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या आढळतात.
योगिनी, वैनायकी यांचे संदर्भ पुराणात आढळतात.
वैनायकी ही विनायकाची स्त्री रुपी प्रतिमा..
वैनायकी ला गणेशानी, लंबोदरी, विघ्नेश्वरी, स्त्री-गणेश असे देखील म्हणतात. गजवदना वैनायकीच्या आसनासमोर मूषक आहे. हातात दंड, अंकुश आणि मोदकपात्र आहे. डावीकडे वळलेली सोंड असून तोंडात हस्तीदंत आहेत. गळ्यात हार, हातात कंकणे आणि पायात नुपूर आहेत.
खालील शिल्पपटात गरुडावर आरूढ वैष्णवी (उजवीकडील) दिसत आहे...
ह्या असंख्य शिल्पाप्रमाणेच उलटे नाग असलेली यादवकालीन बांधकाम रचना येथे आहे.
खांबावर उलटे नाग आणि हत्ती आहे..
गरुडधारी संभाव्य भुयारी मंडपातील आतील भींतीवर शेषशायी विष्णूशिल्प आहे.
मंदिराच्या पूर्णपणे बाहेरील भिंतीवर दोन कां शिल्प आहेत..
मंदिराच्या बाहेर चक्कर मारली तर ढवळगड, पुरंदर, मल्हारगड किल्ले इथून दिसतात.
मंदिर बाहेरून बघितले तर आतल्या शिल्पवैभवाची सुतराम कल्पना येणार नाही असे हे भुलेश्वर मंदिर! मंदिराची सफर करताना नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेटीत तर झालेच परंतु सतत शिल्पवैभवा पाठील हात स्मरणात येत राहिले. एक हात ज्यांनी शिल्पांची तोडफोड केली आणि एक हात ज्यांनी ह शिल्पे घडवली!
सलाम त्या शिल्पकारांना ज्यांच्या सिद्धहस्त चमत्कारातून ही भुरळ पडणारी शिल्पवैभव निर्मिती झाली!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
फिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails टीम:
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
शिल्प आणि मंदिराच्या माहितीसाठी खास आभार:
शंतनू परांजपे: फिरस्ती महाराष्ट्राची
गिरिनाथ भारदे: Ancient Trails

No comments:
Post a Comment