गुरुपौर्णिमेला भाविकांसाठी खुले होणारे श्री. त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर


दि. १६ जुलै २९१९. आज गुरुपौर्णिमा. पुण्यात सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर आणि समाधी आज सकाळपासून भाविकांसाठी खुले झाले.......


पुण्यात, सोमवार पेठेतील हे एक पाषाणशिल्पी प्राचीन मंदिर. 



गर्भगृहातील काळ्या पाषाणातील मोरावर आरूढ गणेश मूर्ती, एक मुख, तीन सोंडा, सहा हात असलेली आहे.



मंदिराला तळघर असून जिवंत पाण्याचा झरा तिथे आहे. श्री. गुरुदत्ताचे भक्त गोसावी यांची समाधी तळघरात आहे. हे तळघर फक्त व्यास अर्थात गुरुपौर्णिमेला भाविकांना दर्शनासाठी खुले असते.

ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळील धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी यांनी १७५४ 

ते १७५७ या काळात मंदिराची उभारणी केली.

गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर लिंगोद्धव शिव शिल्प आणि नटराजाची सुरेख मूर्ती आहे.

द्वारपाल, भारवाहक यक्ष, एकशिंगी गेंडा, गजलक्ष्मी, गणेशयंत्र, शेषशायी विष्णू इ. अप्रतिम कलाकुसर असलेली कोरीव शिल्पे मंदिराच्या दर्शनी भागात, अंतराळ आणि गर्भगृहात आहेत. 

एकशिंगी गेंडा शिल्प



लिंगोद्धव शिव शिल्प

नटराज प्रतिमा



गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन संस्कृत मधील तर एक फारसी भाषेतील शिलालेख आहे. 

तळघरात जायला पायऱ्या आहेत. गुडघाभर पाण्याने तळघर भरलेले असते.

गुरुपौर्णिमा निमित्ताने सकाळी देवदर्शन सोबतच तळघर आणि समाधी दर्शन घेतले. त्याची हे काही छायाचित्रे........

मंदिराची माहिती




तळघरातील दत्तभक्त गुरु गोसावी यांची समाधी


तळघराला जाणाऱ्या पायऱ्या





तळघरातील पाण्याचा जिवंत झरा


गुडघ्याएवढे पाणी





तळघरातील भिंतीतील कोनाडे





समाधीमार्ग



ध्यानाचे स्थान




समाधीस्थळ


गर्भगृहातील गणपती ची मूर्ती



गुरुपौर्णिमा निमित्त केलेले सुरेख सजावट आणि रोषणाई





😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

No comments: