"Dolphin's Nose Trek"
😲😲
कोईमतूर, कोडाईकनाल आणि उटी ला जायचा बेत ठरल्यावर गुगल सर्च करताना ट्रेकबद्दल वाचल. खरं सांगते आनंदाने, आश्चर्याने आणि उल्हासाने मोहरले. कल्पनाच किती सुंदर होती. "सह्याद्री पर्वतरांगा ते थेट पलानी पर्वतरांगा"! Completely Excited!
कोडाईकनाल पासून साधारण ८ किमी दूर हे ठिकाण. डाॅल्फिन प्राण्याच्या नाक सदृश्य आकार म्हणून Dolphin's Nose!
ट्रेकच्या आरंभाला एका दुकानदाराने सांगितल की अडीच ते तीन किमी. Deep Descent आणि तितकाच Stiff Climb!
ट्रेक करायचा तर होताच. डांबरी मेन रस्त्यापासून आत अरुंद रस्त्याने उतरण्यास सुरुवात केली. उतराई किती कठीण आहे ह्याची कल्पना काही मिनिटातच आली. अत्यंत खोल उतराई, अरुंद रस्ता, झाडाची मुळे विखुरलेली, काही ठिकाणी खड्डे पडलेले, काही भाग सपाट पण निसरडा...
आव्हान होत ते झाडांच्या विखुरलेल्या मुळ्यांंमधून वाट काढण्याच! पाय मुळ्यांंमधे अडकला किंवा घसरला तर तोंडावर आपटलाच म्हणून समजा😭😭😭
तोल सावरत उतरायला सुरुवात केली. ट्रेकिंग स्टिक ची सवय असल्याने विना स्टिक उतरताना सुरुवातीला तोल सावरायला वेळ लागला. एकदा जम बसला आणि मग पटापट उतरायला (विखुरलेल्या मुळ्यांचा टप्पा सोडून) सुरुवात केली.
जसं जसं खाली जात होते थंडी वाढत होती. आजूबाजूला घनदाट झाडी आणि काही ठिकाणे दुकाने!
खोल खोल खाली उतरत गेले आणि धुक्याची चादर घट्ट होत गेली...
हिरव्यागार झाडांवर पसरलेलं पांढरट धुकं...
थोड काळजीपूर्वक उतरावं लागत असल्याने आजूबाजूच्या निसर्ग सौदर्याकडे थोडं दुर्लक्षच होत होत.
उतरत होते आणि ठिकाण काहीकेल्या येईना. "और बहोत है, आप आधा आये हो अभी" असं ऐकल्यावर तर जाव की नाही हा प्रश्न पण पडला. 😨😨😨
निश्चय पक्का होता ना 😇😇😇
अजून थोडी उतरले. एकजण म्हणे, "मॅॅम मत जाओ. फॉग बहोत है. कुछ दिख नहीं रहा".
मन मानेना. धुकं अधिकच गडद होत चाललेलं. काळजीपूर्वक उतरायच्या नादात फोटो पण घेण होईना. " सुरक्षित उतरण महत्वाच" असं स्वत:ला बजावत फोटो प्रकरण डोक्यातून काढून टाकल. निसर्गाचा आनंद घेत ट्रेक करायचा ठरवला.
थोडा थोडा पावसाचा शिडकावा झाल्याने काही ठिकाणी पायवाट निसरडी झालेली. एका ठिकाणी तर खालून झरा वाहत होता आणि वरचा पूल म्हणजे एक भला मोठा पसरट पण अरुंद दगड! बापरे! "भय" थोडस का होईना पण जाणवलच😨😨😨
आजूबाजूला काही सुंदर फुले फुलली होती. त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही...😍😍
जवळ जवळ एक तास चालून गेल्यावर Dolphin's Nose View Point पोहोचले. समोरचा संपूर्ण परिसर धुक्याने नटलेला!
थोड उतरून नाकाच्या आकारासारखी दगडी कपार होती. धुक्यामुळे वाटेचा अंदाज येईना. शेवटी नाविलाजास्त्व तिथे जाण्याचा धोका पत्करायचा नाही असे ठरवले.
जवळ जवळ एक तास चालून गेल्यावर Dolphin's Nose View Point पोहोचले. समोरचा संपूर्ण परिसर धुक्याने नटलेला!
थोड उतरून नाकाच्या आकारासारखी दगडी कपार होती. धुक्यामुळे वाटेचा अंदाज येईना. शेवटी नाविलाजास्त्व तिथे जाण्याचा धोका पत्करायचा नाही असे ठरवले.
समोर सर्वत्र आणि संपूर्ण पांढऱ्या धुक्याची लहर. हलकेच झाडाची पाने डोकावत होती. काहीवेळ थांबले, धुके निवळेना. वेळेअभावी परतण्याचा निर्णय घेतला.
मन किचिंत खट्टू झालेलं 😞😞😞
असो.
आता खडी चढाई! शरीर आतून घामाने ओलेचिंब झालेले. अंगावरील जॅकेट काढावे तरी पंचायत. थंडी बाधण्याचे भय!
का कुणास ठाऊक, चढाई कठीण वाटली नाही. ३०-४० मिनिटात चढाई पार झाली. 😀😀😀
मन किचिंत खट्टू झालेलं 😞😞😞
असो.
आता खडी चढाई! शरीर आतून घामाने ओलेचिंब झालेले. अंगावरील जॅकेट काढावे तरी पंचायत. थंडी बाधण्याचे भय!
का कुणास ठाऊक, चढाई कठीण वाटली नाही. ३०-४० मिनिटात चढाई पार झाली. 😀😀😀
चढताना खूप समाधानी आणि आनंदी होते. 😁😁😁
२५ डिसेंबर हा असाच एक अविस्मरणीय दिवस! कुन्नूर-वेलिंग्टन गावाजवळच Dolphin's Nose View Point पाहण्याचा योग आला.
गर्द जंगलातून जाणारा रस्ता. जंगल इतके घनदाट कि सूर्याची किरण पोहोचत नव्हती. ह्या ठिकाणी गाडी जात असल्याने गाडीतून दिसणारे सौदर्य अलौकिक!
वाटेवरील चहाच्या मळ्यांच हिरवगार सौदर्य तर अफलातूनच😍😍😍
सूर्योदय केव्हाच झालेला. खाली खोल दरी! दरीला ढगांचे पांघरूण! नेत्रदीपक दृश्य 😍😍😍सूर्याची कोवळी किरणे ढगांवर पसरलेली. ढगांना लाभलेली लालसर-पिवळसर-पांढरी किनार! हे जे दृश्य दिसल त्याच वर्णन करायला खरच शब्द नाहीत. नाही ते सौदर्य कॅमेऱ्यात पकडता आल. फक्त नेत्रसुख! आठवली ती एक ओळ "सारे जहाँँ से अच्छा हिंदोस्ता हमारा"😍😍🙏🙏💖💖
Dolphin's Nose चा आकार कॅमेऱ्यात पकडता आला..✌✌✌
परतीच्या प्रवासात Doddabetta Peak (Ooty) ट्रेक करण्याचा मानस सोबत घेऊन आलेय.....😊😊😊
No comments:
Post a Comment