भोमाळे ते भोरगिरी: भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य जंगल ट्रेक, ३१ जुलै 2022

 

भोमाळे: 

खेड तालुक्यातील साधारण तीस उंबऱ्यांच हे गाव! इथपर्यंत पोहोचण्यासाठी खेड अर्थात राजगुरुनगर गावातून चास, कमान, वाडा, डेहणे मार्गक्रमण करत भोमाळे गावात येतो. चासकमान धरणाच्या जवळजवळ २५ किमी लांब जलाशयाच्या साथीचा हा मार्ग अत्यंत नयनरम्य आणि रमणीय! सुंदर नजारा पाहत छानपैकी पायपीट करावी, नजारा डोळ्यात साठवावा, मन तृप्त कराव, स्वच्छ, प्रदूषणरहित हवेने फुफुसे फुगून घावी असा हा मार्ग! त्यात भर म्हणून वातावरण जर किंचित ढगाळ, धुंद असेल तर मुक्कामापेक्षा प्रवासच संस्मरणीय! 

धावत्या गाडीच्या खिडकीतून काही नजारे कॅमेऱ्यात टिपत भोमाळे आलं! भोमाळे गावाचं लोकेशन, खेड तालुक्याच्या नकाशावर आधी पाहून घेतलं. 
भोमाळे गावात गाडी थांबली ते प्राथमिक शाळेच्या पटांगणाजवळच! 

शाळा:

इयत्ता चौथीपर्यंत! खार्पुड ला इयत्ता चौथीच्या पुढील इयत्ता! 


इमारतीच्या भिंती सुशोभित केलेली शाळा पहिली आणि माझी शाळा मला आठवली!

शाळा पाहत पाहत गावाचा एक फेरफटका मारला.

घरे:


घराचं सौदर्य म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्ती! 

व्यक्ती :

फेरफटका मारताना एक आजी समोर आल्या. "फोटो काढू का?" विचारलं तर साडी -पदर ठीक करत म्हणे " काढा की"! 


आजींच्या साडीची रंगसंगती खूपच आवडली. त्यातूनही आवडल ते कपाळावरच कुंकू आणि हास्य! 

एक बाबा भेटले. 


दोन गोंडस चिमुरड्या:


गावातील लहान-थोर व्यक्तींशी संवाद साधला की त्यांच्यात सामावले गेल्याची भावना सुख देते, हो ना....

लोकजीवन, त्यांचा पेहराव, भाषा, राहणीमान., आपुलकी दर्शवणारी देहबोली....त्रिवार नमन!

व्यवसाय:

मुख्यत: भातशेती


भोमाळे देवराई:

वनराई च्या रक्षणार्थ देवांचा निवास ! मंदिरासमोर वीरगळ देखील पहायला मिळाल्या. पक्षांचा मुक्त संचार, किलबिलाट , फुलपाखराचे  बागडणे.. काय सुंदर नजारा ..ह्या देवराईपासून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातून मार्गक्रमण करत भोरगिरीपर्यंतचा जंगल ट्रेक हा गाभा!

भोमाळे तर भोरगिरी : भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ट्रेक:

ट्रेकच्या आधी सहजच गुगुल वर बातम्या वाचल्या. भोमाळे घाटात दरड कोसळली, पौष्टिक रानभाज्या उत्सव आणि  नुकताच ह्या परिसरात रानगवा दिसला.  असो. 

जंगलातून मार्गक्रमण सुरु झालं. मुख्यत: कारवी ने फोफावलेलं हे जंगल. अक्षरशः वाकून जाव लागत होत कारण फांद्या आडव्या-तिडव्या विखुरलेल्या. खाली पावसाने भिजलेला पाळापाचोळा! जंगल मग पठार, जंगल मग पठार अशी काहीशी रचना! हवामान कधी ढगाळ तर कधी उन्हाची तिरीप! सूर्याचे किरण जंगलात पसरले तर सुंदर ऊन-सावलीचे पोस्टर!

जंगल संपत्ती:

विविध फुले, फळे, कीटक, पाण्याचे झरे, वृक्ष, विविध आकाराची पाने, औषधी वनस्पती..हीच तर जंगल संपत्ती! जंगलात गांडूळ खाण्यासाठी रानडुकरांनी कित्येक ठिकाणी माती उकरलेली पाहायला मिळाली. सांबराचे पायाचे ठसे पाहायला मिळाले. 

मुसळी

शतावरीची वेल

हो, तीच ही वेल, ज्यापासून शतावरी कल्प बनवतात. अत्यंत औषधी!

सुरवंट

सुरवंट, पाहिलं तेव्हा कळलच नाही त्याच तोंड नक्की कोणत्या बाजूला आहे. 

लोखंडी

शिंपले

जंगलभर दिसून आले. अगदी पांढरे शुभ्र! 

गोगलगाय

खेकडा

हे सर्व टिपायला एक विलक्षण बारीक नजर लागते. जंगल अभ्यासण सोपं काम नाही. 

मुंग्यांचे वारूळ

भूछत्र

भूछत्र


आर्किड
जंगलवाट तर भलत्याच मोहक असतात.. चालणं हा वाटेचा स्थायीभाव!


जंगलातील हे खळखळणारे पाण्याचे झरे जंगलाचे सौदर्य अधिकच खुलवतात! 

जंगला संपत्ती पाहत जात असताना काही किडे खूप घोंघावत होते. अगदी चावत सुद्धा होते. जंगलातून जाताना काय काळजी घ्यायची हा धडा ह्या अनुभवातून मिळाला. फुलं स्लीव्हज चे कपडे, टोपी..किडे कानाभोवती घोंघावत होते म्हणून स्कार्फ पण कानाभोवती गुंडाळला.


जंगलातून जाताना पायवाटेच्या आसपासचाच भाग निरीक्षणाखाली येतो म्हणूनच जंगल मार्गक्रमण कदाचित प्रत्येक ऋतूमध्ये करायला हवे. तेव्हा इथली जैवविविधता अधिक ठळकपणे अनुभवता येईल. 

हा जंगल मार्गक्रमण सुकर झाला तो आमच्या स्थानिक चंदू भोमाळे गाईड मुळे!  गावात आरोग्य केंद्र आहे. आशा वर्कर आहे. वाडा हे जवळचे मोठे गाव. जिथे भाजीपाला बाजार, धान्य इ. साठी जाव लागतं  आमच्या गाईड चा मुलगा पुण्यात बी. फार्मसी करतोय. आहे ना कौतुकाची गोष्ट!

जंगलातील तीन तासाचे मार्गक्रमण भन्नाटच!


ट्रेक ची सांगता: 

ते  संपवून आली येळवली.  येथे  श्री सुभाष डोळस यांच्याकडचे सुग्रास  भोजन. 


भोरगिरी: कोटेश्वर मंदिर

येळवली ते भोरगिरी साधारण २ किमी चा टप्पा. कोटेश्वर मंदिरातील ही वंदनीय गणेशप्रतिमा!हा सुंदर अनुभव मिळाला तो माची इको आणि रुरल टुरिझम या ग्रुपमुळे! जवळ जवळ दोन वर्षानंतर ट्रेक झाला. त्यानिमित्ताने आम्ही एकत्र आलो. ट्रेक दरम्यान आठवणींची धमाल केली. 
जंगल नियमांनुसार शांतता जपत आणि बोलण्याचा आवाज न करता ट्रेक केला तरी पठार आलं की दोन वर्ष मनात साठलेल्या भावना व्यक्त झाल्या.  


निसर्गसौदर्यासोबत, व्यक्तीसौदर्याचा अनुभव म्हणजे जणू नारळाच्या बर्फीची गोड चव! जितकी तोंडात चघळत राहील तितकी जास्त गोडी वाढवणारी!

हा गोडवा असाच कायम राहो! 

येणाऱ्या सर्व सणांच्या शुभेच्छासहित! 

Keep Trekking! Keep Exploring! Be a Responsible Tourist! Save Enviornment!  

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

फोटो आभार: सर्व ट्रेक टीम

विशेष आभार: राजकुमार डोंगरे, प्रशांत शिंदे, पल्लवी वडस्कर-शिंदे, रोहिणी कित्तुरे (माची ग्रुप)

3 comments:

Pallavi Wadaskar said...

खुप छान सविता मॅम ...परत जंगल फिरून आल्या सारखे वाटले 😍😍

Anonymous said...

नेहमप्रमाणेच सुंदर वर्णन 👍🏻👌🙏

Anonymous said...

चतुरस्त्र लिखाण, ट्रेकिंग चे सर्व बारकावे उत्तमरित्या टिपलेत, सर्व फोटो 👌🏻👌🏻😍