कुज़न्थई वेलप्पार मंदिर, पोंबराय, तमिळनाडू, डिसेंबर २०१८


डिसेंबर २०१८ मधे कोडाईकॅॅनल मधे असताना एका व्यक्तीकडून पोंबराय गावात असणाऱ्या ३००० वर्षाचा इतिहास असणाऱ्या  मंदिराबाबत समजल. इतकं वर्ष जुनं मंदिर! महाराष्ट्रातील काही जुनी मंदिर माहित होती पण तमिळनाडू राज्यातील एक जुनं मंदिर! कसं असेल मंदिर स्थापत्य, शिल्पकला, मूर्तीकला, काय असेल मंदिराचा प्राचीन इतिहास...उत्सुकतेपोटी मंदिर बघण्यास गेलो. तिथे असताना मंदिराची माहिती हिंदीतून मिळाली नाही. गुगल वर इंग्लिश/तमिळ भाषेत माहिती उपलब्ध आहे. ती वाचताना तमिळ भाषेचा, संस्कृतीचा मागोवा घेणे, तो माहित असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

हिंदी गुगल मधे अनुवादित माहिती वाचायला मिळते. ह्या माहितीच्या आधारावर हा ब्लॉग लिहायचा ठरवला. याला मुख्य कारण गुगल वर मंदिराचे बाह्यभागाचे फोटो आहेत. परंतु मंदिराची खासियत शिल्पकला, कोरीवकाम आहे त्याचे फोटो इथे उपलब्ध नाहीत. माझ्याकडे जे फोटो आहेत ते ब्लॉग निमित्ताने पुढे यावेत म्हणून हा खटाटोप!

३००० वर्षापूर्वीचे मंदिर, त्यावरील कोरीवकाम अजूनही अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे ही खरच अचंबित करणारी गोष्ट! इतक्या सुंदर मंदिराला, तेथील कोरीव कलाकुसरीच्या कामाला आणि तिथल्या संस्कृतीला मानाचा मुजरा करत हा ब्लॉग समर्पित!

पोंबराय तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. कोडाईकॅॅनल पासून साधारण १८ किमी अंतरावर. पोंबराय एकदम शांत. डोंगराच्या कुशीत पहुडलेले. फारसे कोणी पर्यटक , (त्यातून अन्य राज्यातील) इथे जात नसावेत. मंदिर परिसर एकदम शांत आणि प्रसन्न. बिलकुलच हलकल्लोळ नाही. 

मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर समोरच मंदिर समूह दिसतो.


मंदिराच्या कळसावर मूर्ती कोरलेल्या. त्यांना डोळ्यांना भडक वाटणार नाही असे रंग दिलेले. लांबून तर हे रंग लक्ष वेधून ही घेत नाहीत. जवळ गेल्यावर रंग लक्षात येतात. डोळ्यांना शांत भाव देणारी रंगसंगती. 


महाराष्ट्रातील काही प्राचीन पाषाणातील मंदिरे आता रंगवली आहेत. ते रंग खूप भडक वाटतात. डोळ्यात भरतात. दोन संस्कृती मधील कदाचित हा एक मोठा फरक असेल. असो. 

गुगलवरील उपलब्ध माहिती नुसार आणि मंदिरावर जो तमिळ भाषेतील शिलालेख आहे त्यावरून एकेकाळी तमिळनाडू राज्यावर राज्य करणाऱ्या  चेरा वंशाच्या राजद्वारा हे मंदिर बांधले.Poombarai Murugan Temple ला  कुज़न्थई वेलप्पार मंदिर(  Kuzhanthai Velappar Temple) असे म्हणतात. Murugan अर्थात भगवान कार्तिकेय! तमिळ भाषेत भगवान कार्तिकेयन!  Kuzanthal  म्हणजे "अर्भक (Infant)  आणि Velappar म्हणजे " शस्त्राधारी" (Holding a Weapon). थोडक्यात अर्थ आहे पारंपारिक शस्त्र हातात धरलेला बाल कार्तिकेय! कार्तिकेयन चे पारंपारिक शस्त्र आहे "भाला"! इथल्या कार्तिकेयाच्या  मूर्ती विषयी वाचण्यात आले ते पुढील प्रमाणे,

It is 3000 years old and was consecrated by his holiness Bhogar. Bhogar built both Palani Murugan statue as well as the statue here in Poomparai. Whereas Palani Murugan status is made up of Navabhaasaanam (nine herbs/elements), the statue here is made up of Dashabhaasaanam (ten herbs/elements).
कार्तिकेय चे वाहन मोर आहे. मंदिरासमोर मोराची प्रतिमा देखील आहे. मंदिरावर सुरेख पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. शिल्पकला आहे. 
मंदिर पाहताना शांत, प्रसन्न, दैवी भाव अनुभवास येतो. 

कार्तिकेय:गणपती:दत्तात्रेय:


नंदिशिल्प:

नवग्रह:
 नागदेवता:


ध्वज आणि बालापीठशिल्पकला:
खूप साऱ्या शिल्पांची ओळख करून घेणे क्रमप्राप्त असले तरी एक अनोखी संस्कृती या ब्लॉगच्या निमित्ताने डोळ्याखालून  गेली हे ही नसे थोडके!

महाराष्ट्राबाहेरील अशाच काही मंदिरांना पुढे भेट देता येईल अशी आशा करते. No comments: