शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे जुन्नरचे प्रसिद्ध ऐतिहासिक पंचलिंग मंदिर! ३० जून २०१९. शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन आम्ही आलो पंचलिंग मंदिर पाहण्यासाठी.मंदिराच्या दर्शनी भागावर मंदिराच्या नावाची पाटी आहे. सोमातवाडी रस्त्यावरून शिवश्रुष्टीकडे जाताना हे मंदिर लागते.
फाटकातून आत गेल्यावर मंदिराची घरवजा वस्तू दिसते.
मंदिराच्या कळसाचे इथून दर्शन होते.
कळस, मंदिराच्या मागील बाजूने ...
कळसावर काही सुंदर शिल्प कोरलेली आहेत.
मंदिराच्या घर वजा दर्शनी भागातील किंचित बसक्या दारातून आत गेल्यावर एक भली मोठी ओसरी आहे. ओसरीला लोखंडी गज असलेली कमान आहे. ह्या गजापलीकडे आहे मुख्य मंदिर.
मुख्य मंदिरासमोर पाण्याचे कुंड आहे. पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब घेण्याचा प्रयत्न केला. शिखर पूर्ण बसेना म्हणून प्रतिबिंबावर फोकस केला.
डावीकडून मंदिराच्या मुख्य भागाकडे प्रवेश केला. शिवमंदिराच्या समोरील नंदीमंडपातून सुरेख दिसले मुख्य मंदिर!
शिवलिंगाचे दर्शन घेऊन निघताना नंदिशिल्प आणि मंडप इतके सुरेख दिसले. गणेश प्रतिमेने त्याचे सौंदर्य खुलून आले.
नंदी मंडपासहित मुख्य मंदिराचे दृश्य
पुष्करिणी
कीर्तीमुख आणि गणेश प्रतिमा असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून गाभाऱ्याचे दर्शन
मंदिराच्या अंतराळात आहे कासव प्रतिमा, गणेश आणि शिवपार्वती.
गाभाऱ्यात आहे पिंड/लिंग रहित शाळुंका आणि पार्वती मूर्ती
पिंड/लिंग विरहीत पन्हाळीसहित शाळुंका विस्मयाने पाहतच राहिले.
का असावे असे? पंचलिंग मंदिर म्हणताना लिंग विरहीत शाळुंकेला पंचलिंग का म्हणावे?
वाचण्यात आलेली माहिती: शिवमूर्तींबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते.
ह्या मंदिरात तर पन्हाळी सहित शाळुंका आहे, पार्वतीची पूर्ती देखील आहे परंतु शिवलिंग नाही. इथे शिव अभिषेक होतच नसावा का?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले खरे, परंतु नंतर वाचनात आले कि हि पिंड स्वयंभू आहे. दिसताना एकच दिसत असली तरी पिंडीचा मध्यभाग खोलगट आहे. ह्या खोलगट भागात पाच पिंडी कोरल्या आहेत. म्हणून हे पंचलिंग मंदिर!
नाना फडणवीसांचे मेहुणे शिवनेरीचे सुभेदार होते. त्यांनी इ.स. १७७७ साली पूर्वाभिमुख दगडी थाटातील हे पंचलिंग मंदिर बांधले असे वाचनात आले.
श्रावण महिन्याच्या दर सोमवारी ह्या शिवालयात परंपरागत तांदळाच्या सुबक पिंडी केल्या जातात. ही परंपरा साधारण २०० वर्ष जुनी आहे.
ई-सकाळ, सोमवार, २६ ऑगस्ट २०१९ मध्ये श्री. दत्ता म्हसकर यांचा लेख वाचण्यात आला. लेखात नमूद केलेला भाग असा,
एक आगळेवेगळे जुन्नरच्या प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर यावेळी पाहता आले ह्याचे समाधान घेऊन परततानाचा आनंद अलौकिकच!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
फोटो आभार: सुप्रसाद पुराणिक

No comments:
Post a Comment