कबर, मादाम, गारंबी (जगातील सर्वात मोठी शेंग), माकडलिंबू इ.
रानफुलं.... शिक्रा, सूर्यपक्षी इ. पक्षी....बरोनेट, सेलर ग्रास येलो सारखी
फुलपाखरे .....हे सर्व आणि अन्य बरचं काही, एकत्र एका नेचर ट्रेल मध्ये पाहिलं आहे
का हो तुम्ही? ते ही आपल्या जीवाभावाच्या सह्याद्री पर्वतरांगा आणि तिथे वसलेल्या
निबिड जंगलामध्ये? काय म्हणता? हे सर्व पाहता आलं तर काय बहार येईल ना आपल्याही
आयुष्यात?
निमित्त होतं घनगड आणि तैलबैला ट्रेक! सह्याद्रीत विस्तीर्ण
पसरलेल्या जंगलाच्या मोह्पाशात स्वत:ला सैर करायचं...काय भन्नाट अनुभव असेल नाही?
रविवार,१६ फेब्रुवारी २०२० हा तो मंत्रमुग्ध बहार दिन!
"माची इको अॅॅन्ड रुरल टुरिझम" नामक पुण्यातील ग्रुपसोबत!
आम्ही पाच जण घनगड कडे निघालो. ताम्हिणी घाटातील सूर्योदय, फुलेलेल्या वनस्पती यांचा मनमुराद आनंद घेत पुढची वाट चालत होतो. काटेसावरीची लालसर उमलेली फुले डोळ्यांना किती सुखदायक!
रत्याच्या दुतर्फा नारंगी रंग उधळीत खुणावणारा पळस म्हणजे मनस्वी आनंदच!
रत्याच्या दुतर्फा नारंगी रंग उधळीत खुणावणारा पळस म्हणजे मनस्वी आनंदच!
ताम्हिण घाटाचा मेन रस्ता
सोडून घनगडसाठी आतील रस्त्याला शिरलो. पहिली बहार म्हणजे प्लस व्हॅली व्ह्यू पॉइंट ! प्लस व्हॅली ट्रेक मी केला असल्याने ह्या व्ह्यू पॉइंटवरून कमाल दिसणाऱ्या
प्लस व्हॅलीची खोली ,अजबच! (व्ह्यू पॉइंट
ला फोटो काढण मस्ट आहे हे वेगळ सांगायला नकोच).
ह्या वाटेवर अंजनीवेल ची काही उमललेली काही कोषात गुडूप अशी जांभळट फुले...
हिरेजडीत कर्णफुलेच कि!
हिरेजडीत कर्णफुलेच कि!
ह्या वाटेवर पाहता आलेले अजून एक मनमोहक फुलं आहे मादाम! मी आजीवलीच्या देवराईत हे फुलं पहिले होते. तेव्हा सह्याद्रीमध्ये त्याच ते पहिलच दर्शन! सोनेरी पिवळसर रंगाच हे फुलं पाह्यला मिळणे अतिशय दुर्मिळ!
माची ग्रुपचा "वनस्पतीशास्त्र तज्ञ राजकुमार डोंगरे (आरके)
ह्याने मागील आठवड्यात रेकीच्या वेळी काही शोध आधीच करून ठेवले होते. ते शोध
आमच्यासारख्या "जाणकारांसोबत" शेअर करायला तो आसुसला होता. पहिला शोध
होता "कबर"! म्हणजे "ती" कबर नाही हो....कबर नावाची एक
वनस्पती. गाडीतून उतरून आम्ही आरके च्या मागोमाग निघालो. एका पुलाखाली कोरडा पडलेल्या
ओढ्यातल्या दगड-गोट्यातून वाट काढत निघालो. किंचित आत गेल्यावर "कबर"
वनस्पती आणि फुलं दृष्टीस पडलं. पाणीविरहीत शुष्क ओढा त्या फुलांनी बहरून गेला होता. फुलावरून
नजर हटत नव्हती. कुठल्या फुलाचा फोटो आणि कोणत्या अॅन्गल ने घ्यायचा असे झाले . निसर्गाचा अजून एक चमत्कार! जमिनीलगत फोफावणाऱ्या ह्याच्या फांद्या काटेरी असतात बरं का. त्याच फुलं मात्र आत्मिक सुखाचा अनुभवप्रद! नाव पण पहा ना "कबर"! हटकेच आहे चांगलच! ह्या फुलांचा आनंद घेण्यात वेळ सरसर पुढे सरली.
गडवाटेवरच्या जंगलात बरचसं आत आम्ही गेलो. इथे अजून एक दुर्मिळ प्रकार आरके ने दाखवला, हो "गारंबीची शेंग"! आरके ने जेव्हा सांगितलं कि "जगातील सर्वात मोठी शेंग असते" त्याक्षणी आपल्या सह्याद्रीचा अभिमान वाटला. उंच उंच झाडावर ४ ते ५ फुट लांबीची हि शेंग! गारंबीला निसर्ग संवर्धनाची नितांत गरज आहे हे कळल्यावर जंगलातील मातीत रुजलेल्या बीया सोबत आणल्या. पुढच्या पावसाळ्यात निबिड जंगलात बीया रुजवून गारंबीच्या संवर्धनामध्ये तेवढाच खारीचा वाटा!
जंगलात आत आत उंबळीचा वेल आणि त्यावरील कोन आणि ते हि जंगलाच्या कितीतरी एकरात पसरलेले पाहून आवक झालो. त्याच खोड शोधण्याच्या यशस्वी उपक्रम तिथे पार पडला. त्या खोडाच्या आणि फांद्याच्या उबदार छायेत काही सुंदर क्षण यथेच्छ घालवले.
गडेवाटेवर बरेचसे पक्षी दिसले. त्यांना पाहण्यातच धन्यता! फोटोचा विचार करूच नये.
इतर काही वाटेवरची सुंदर फुले
घनगडाच्या पायथ्याच गाव एकोले! गावात मंदिर असतच तसं इथे घनगड आहे. गावातच विसावलेला.
इतर काही वाटेवरची सुंदर फुले
घनगडाच्या पायथ्याच गाव एकोले! गावात मंदिर असतच तसं इथे घनगड आहे. गावातच विसावलेला.
किंचित वळणावळणाची खडी चढण चढून गडाच्या प्रवेशदवारापाशी आलो. उजवीकडे एक कातळ कपार, समोर पाण्याचे टाके आणि गुहेसदृश्य रचना, डावीकडे चालू लागली कि समोर दिसते खडी, कातळावर चिकटून उभारलेली लोखंडी शिडी! उंच, ताठ शिडी पाहून धसकीच भरली. ही शिडी चढून जायची आहे हे कळल्यावर तर घाबरगुंडीच उडाली. गडावर जायला शिडीचा काय तो एकच मार्ग!
माझी चढायची वेळ आली. दीर्घश्वास घेतला. एकावेळी एका लोखंडी पट्टीवर पाय देत पूर्ण एकाग्रतेने शिडी चढले. शेवटच्या टप्प्या जरा खतरनाक आहे बरं का. डावीकडे वळायचं. तिथे गडाच्या अवशेषाला पाषाणात एक लोखंडी सळई फिट केली आहे. तिचा आधार घेत वाट नसलेल्या जागेवर पाय ठेवत गडावर चढायचं. बापरे! शिडी चढण्यापेक्षाही भयानक कठीण प्रकार! पाय घसरला तर थेट खालीच!
एक एक करत सर्वजण गडावर आले. गड प्रदक्षिणा करत आजूबाजूचा परिसर न्याहाळताना मजा आली. किंचित धुक होत त्यामुळे स्पष्ट काहीच दिसल नाही. समोरचा तैलबैला मात्र किलिंगच! ट्रेक सुरु केल्यानंतर माहित नाही किती वर्षापासून तैलबैला बघायचा होता. त्याची मोहिनी होती व्ही प्रकारातील दरीमुळे जोडणाऱ्या दोन भिंतीची! एक अत्यंत अनोखी रचना! तैलबैलाच्या प्रस्तरारोहणाचे किस्से काही ऐकलेले आणि काही वाचलेली. त्याचीच मोहिनी! त्या मोहजालात अजूनही अडकलेली!
घनगडावरून दिसणारी तैलबैलाची मोहक छबी मनात साठवत तिच्या मोहपाशात प्रत्यक्ष मशगुल होण्याची आस होती मात्र खासच!
घनगड उतरणे चढण्यापेक्षा कितीतरी पटीने भयानक! स्वत:ला सावरत, धीमी पावले टाकत एकदाचे लहूच्या घरी आलो. चार वाजले होते.
दोन-तीन तासांची घनगड स्वैरभ्रमंती! आम्ही भुकेने व्याकूळ! बाजरीची भाकरी, पिठलं, भात-वरण, लोणचे, हिरव्या मिरचीचा खर्डा! यथेच्छ ताव मारला.
पाच वाजता गाडी निघाली तैलबैलाकडे! त्या पूर्ण मार्गावर कुठून न कुठून तैलबैला दिसतोच! जसा जसा जवळ येत जातो तसं तशी त्याची रचना मन भुलवणारी! अंगाचा थरकाप उडवणारी! अंगावर काटा आणणारी! जादुई! बसाल्ट खडकाच्या ह्या भिंती! सवाष्णी आणि वाघजाई घाटावर नजर ठेवण्यासाठी उत्तम रचनात्मक!
साधारण अर्धा तासाची चढण चढल्यावर समोर उत्तुंग कातळ भिंत दिसली! वर्णन करण्यास कठीणच! पाहत रहावे आणि मनात साठवत रहावे. अशी कशी सौदर्यसंपन्न रचना निर्माण होत असेल? आश्चर्यच नाही का एक?
भिंतीच्या कडेकडेने व्ही आकाराच्या दरीजवळ आलो. दरीच्या दारातच प्रथम दर्शन महादेवाच! भुरळ पडणाऱ्या भिंतीच्या बाहुपाशात विसावण्याची जादुई किमया नक्कीच खास!
दरीच्या उंबरठ्यावर निवांत बसून अस्ताला जाणारा सूर्य पाहणे जणू त्या मोहमयी बाहुपाशात सुखमय निद्राधीन होणे!
गाडी पुण्याकडे निघाली! डोळ्यासमोर तीनच गोष्टी होत्या, कबर, गारंबीची शेंग आणि तैलबैला.......
सह्याद्री उलगडत जातो तो असा! प्रत्येक वेळी एक आगळावेगळा सह्याद्री.....
घनगड आणि तैलबैला ची हि अनोखी सफर! कशी वाटली? अभिप्राय नक्की द्या!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
फोटो आभार: ट्रेक टीम

1 comment:
किती छान लिहिलंय.सह्याद्रीवर प्रेम जुळायला पण नशीब लागतं
Post a Comment