जवळ जवळ तीन महिन्याच्या अंतराने आज दिनांक ५
जून २०१६ रोजी विसापूर ट्रेकला निघाले. एस.जी. ट्रेकर्स बरोबरचा हा माझा १० वा
ट्रेक. त्यामुळे बऱ्यापैकी सर्वजण आता ओळखीचे झालेले आहेत. सकाळी ६.४० च्या
पुणे-लोणावळा लोकलने प्रथम मळवली आणि नंतर भाजे. ८ च्या दरम्यान मळवलीला पोहोचलो.
तिथून चालतं चालतं भाजे गावात आलो. ह्या मार्गावर भगवान भोई मला म्हणे, “
म्याडम, आम्ही आहोत चला”. ते शब्द खूप आधार देऊन गेले. कारण मनात कुठेतरी थोडी
भीती होती. तीन महिन्याच्या कालांतराने ट्रेकला चाललेय तर जमेल कि नाही. ह्या
कालावधीत काहीही व्यायाम झाला नव्हता. भाजे गावात फक्कड नाश्ता झाला. ट्रेकला
आलेल्या सहभागीची ओळख परेड झाली. नवीन सीझनचा पहिला ट्रेक म्हणून पेढा मिळाला.
हिरकणी साहसी क्लब ची घोषणा, विशाल काकडे आणि नेहाली बुचडे यांनी केली.
त्यासोबत त्याने गडाची माहिती देखील दिली.
आता ट्रेकला सुरुवात झाली. डांबरी रस्त्याने
चढाची आडवी-तिडवी वळणे पार करत विसापूर ट्रेकच्या आरंभाला येऊन ठेपलो. साधारणत: ३
किलोमिटरचा हा मार्ग पुरा करण्यात पुरा घाम गळाला. एकतर खंड पडलेला आणि दुसरं कारण
हवामान. इलेक्ट्राल पावडर पोटात जात होतीच. शंकर स्वामी मला सोबत करत होता,
शांतपणे आणि संथपणे. “आम्हाला माहित आहे तुम्ही ट्रेक पूर्ण करणार” ह्या
विश्वासाच्या वाक्याने ट्रेक पूर्ण करण्याची उमेद निर्माण झाली. मधेमधे थांबत,
फोटो काढत विसापूरच्या आरंभाला आलो. विशालने माझ्याकडे बघितले आणि नेहमीच्या
लकबीने,सवयीने विचारले, “म्याडम, ओके ना?”. म्हणल,
“ नेहमीचे प्रश्न विचारायचे नाहीत असं मी ठरवलय”. माझे नेहमीचे प्रश्न असायचे,
“मला जमेल ना? ट्रेक खूप कठीण तर नाही ना? एक्झार्शन तर होणार नाही ना?, अजून
कितीवेळ लागणार? रॉक पॅचेस तर नाहित ना ? इ...”. थोडी
शंका असेल तरिही विशालला आधीच विचारायचं आणि विशाल पण खूप सविस्तर ट्रेकची माहिती
द्यायचा. प्रोत्साहित करायचा. ह्या सिझनला एकच ठरवलं ट्रेकला जायचं कि नाही ते
ठरवायचं. बस्स.


आता गड उतरण सुरु केलं. परत तसेच दगडगोटे. वाट
संपता संपत नव्हती. मागून आवाज येत होते,” म्याडम आहेत ना पुढे? जरा लक्ष द्या.”.
अनिकेत तर लगेचच सोबतीला आला. इतरही अनेक सहभागी मदतीला तत्पर होते.
गड उतरला. भाजे लेण्याला आलो. हा पहिलाच ट्रेक
ज्यात तळपाय दुखत होते. लेणी बघण्याची ताकद नव्हती. विशालच्या आग्रहाखातर रर्वीद्र
इनामदार सोबत लेणी बघितली. भाजे गावात आल्यावर बूट काढले, चप्पल घातली तेव्हा
बरं वाटलं.
नाश्ता करून मळवली स्टेशन गाठलं. परतीचा प्रवास सुरु.
लोकल मधे इतरांची गाण्याची मेंफल रमली. पुणे स्टेशन ला उतरून १०.३० ला घरी
पोहोचले. गरमा गरम दुध पिऊन झोपले, ताजेतवाने होऊन उद्या आफीसला जाण्यासाठी!
गड/ किल्ला चढून गेल्यानंरचा आनंद आणि गड/
किल्ला पुन्हा उतरल्याचा आनंद शब्दात लिहिण्यासारखा नाहीच. प्रत्येकाने तो स्वत:च
अनुभवायचा. स्वत:च्या परीने त्याचा आनंद घ्यायचा.
No comments:
Post a Comment